चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज सहावा दिवस आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. संघाने पदकांचा वर्षाव केला आहे. महिला संघानंतर आता पुरुष संघानेही पदक पटकावले आहेत. ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसाळे आणि अखिल शेओरन यांच्या संघाने ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. या संघाने विश्वविक्रमही केला आहे. Asian Games 2023 Another gold for India in shooting mens team sets world record
ICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, शेवटच्या दिवशी केला ‘हा’ बदल
यापूर्वी 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष संघाने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते. सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल यांनी आपल्या कौशल्याने संपूर्ण देशाची मान उंचावली. महिला संघाने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारातही रौप्यपदक पटकावले. भारताच्या ईशा, दिव्या आणि पलक यांनी हे पदक जिंकले. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज सहावा दिवस आहे. पाच दिवसांनंतर भारताच्या खात्यात एकूण 25 पदके आली आहेत. त्यात 7 सुवर्ण पदकं आहेत.
सहाव्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे. आतापर्यंत भारतीय नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आज त्यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा असतील. सर्वांच्या नजरा महिला बॉक्सर निखत जरीनवर आहेत. ती उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल आणि जर तिने हा सामना जिंकला तर तिचे पदक निश्चित आहे. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूसह एचएस प्रणॉयकडूनही पदकाची अपेक्षा आहे.
Asian Games 2023 Another gold for India in shooting mens team sets world record
महत्वाच्या बातम्या
- भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; पण घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??
- ‘राजद’ने मनोज झा यांच्यासाठी Y श्रेणीची सुरक्षा मागितली, जाणून घ्या काय आहे कारण?
- आमदार सुखपाल खैरांच्या अटकेवरून पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष!
- Manipur Violence : मणिपूरमध्ये मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घराला जमावाने केले लक्ष्य