आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे. पुन्हा एकदा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. भालाफेकच्या अंतिम सामन्यात भारताला दोन पदके मिळाली. नीरजने सुवर्ण तर भारताच्या किशोर कुमार जेनाने रौप्यपदक पटकावले आहे. Asian Games 2023 Neeraj Chopra wins gold medal in javelin Kishore Jena wins silver
आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. किशोरनेही सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या दोन खेळाडूंच्या पदकांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता 80 वर पोहोचली आहे.
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी टीम पाठवली आहे आणि या स्पर्धेत 100 पदकांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आहे. हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे घोषवाक्य “अब की बार, सौ पार” आहे.
महत्वाच्या बातम्या
- VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!
- शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!
- बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी
- आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा; दिल्लीतील घराची झडती, अबकारी धोरण केसच्या आरोपपत्रात नाव