• Download App
    गणपती बाप्पा मोरया, लंकेचा वाजला बोऱ्या; आशिया चषकात भारताचा अष्टकार!! asia cup win 8 time india vs srilanka

    Asia cup : गणपती बाप्पा मोरया, लंकेचा वाजला बोऱ्या; आशिया चषकात भारताचा अष्टकार!!

    वृत्तसंस्था

    कोलंबो : गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मुहूर्तावर दुष्काळाचे सावट असलेल्या महाराष्ट्रात पाऊस आला आणि भारतीय क्रिकेट संघाने तमाम भारतीयांना आनंद वार्ता देत आशिया चषक जिंकला. asia cup win 8 time india vs srilanka

    आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात गणपती बाप्पा मोरया, लंकेचा वाजला बोऱ्या!! म्हणत भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकन क्रिकेट संघाचा तब्बल 10 विकेटने धुवा उडविला. मोहम्मद सिराजने जबरदस्त भेदक मारा करत लंकेचा संपूर्ण डाव अवघ्या 50 धावात गुंडाळल्यानंतर भारतासाठी 51 धावा करून विजय मिळवणे ही औपचारिकताच उरली होती, ती शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी पहिल्याच विकेटच्या भागीदारीत पूर्ण करून टाकली आणि भारताने आठव्यांदा आशिया चषक जिंकला.

    पावसामुळे 40 मिनिटे उशिरा सुरू झालेला सामना इतक्या लवकर संपेल कुणी विचारही केला नव्हता. मात्र, मोहम्मद सिराजने कहर केला अन् भारतीय संघाने श्रीलंकेला विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता  भारतीय संघ आशियाचा नवा बादशाह झाला आहे. डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या 51 धावांचे आव्हान पार करताना टीम इंडियाने एकही गडी न गमावला सामना खिशात घातला. शुभमन गिल आणि ईशान किशनच्या जोडीने काम फत्ते केले. मात्र, विजयाचा खरा शिल्पकार ठरला मोहम्मद सिराज!!

    टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध कहर केला. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॅप्टन दासुन शनाकाचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सपशेल फेल ठरवला. बुमराहने सामन्याच्या पहिल्याच बॉलवर कहर केला. सलामीवीर कुसल परेरा तंबुत धाडत बुमराहने नारळ फोडला. त्यानंतर सिराजने कहर केला. चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने एक दोन नव्हे तर चार प्रमुख फलंदाज तंबुत धाडले. सलामीवीर पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका आणि धनंजय डी सिल्वा या चार खेळाडूंना घरचा रस्ता दाखवल्यानंतर टीम इंडियाचे काम सोपे झाले.

    रोहित शर्माने श्रीलंकेची वाईट अवस्था पाहून फिल्डिंग आणखी टाईट केली. एका बाजूने सिराजचा कहर सुरू होता, तर दुसऱ्या बाजूने रोहितने हार्दिकला बॉल सोपवला. हार्दिकने देखील कॅप्टनच्या विश्वासाला साथ देत 3 धावा देत 3 गडी टिपले. श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत आठव्यांदा आशिया चषक जिंकला आहे.

    असे होते दोन संघ :

    श्रीलंका : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.

    टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

    asia cup win 8 time india vs srilanka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!