• Download App
    Ashwini Vaishnav Profile : कोण आहेत अश्विनी वैष्णव? माजी सनदी अधिकारी, वाजपेयींचे सचिव, आता मोदींनी दिली रेल्वे व आयटी खात्यांची जबाबदारी । Ashwini Vaishnav Profile Know About EX IAS, Vajpayees PS Vaishnav now in Modi Cabinet

    Ashwini Vaishnav Profile : कोण आहेत अश्विनी वैष्णव? माजी सनदी अधिकारी, वाजपेयींचे सचिव, आता मोदींनी दिली रेल्वे व आयटी खात्यांची जबाबदारी

    Ashwini Vaishnav Profile : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात अश्विनी वैष्णव हे सर्वांनाच चकित करणारे नाव आहे. माजी सनदी अधिकारी अश्विनी वैष्णव यांना रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान यासारखी महत्त्वाची मंत्रालये देऊन पीएम मोदींचा त्यांच्यावरील विश्वास स्पष्ट होतो. अश्विनी वैष्णव यांनी वर्षानुवर्षे काम करून हा विश्वास संपादन केला आहे. आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये काम करणारे अश्विनी वैष्णव यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिवही राहिलेले आहेत. Ashwini Vaishnav Profile Know About EX IAS, Vajpayees PS Vaishnav now in Modi Cabinet


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात अश्विनी वैष्णव हे सर्वांनाच चकित करणारे नाव आहे. माजी सनदी अधिकारी अश्विनी वैष्णव यांना रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान यासारखी महत्त्वाची मंत्रालये देऊन पीएम मोदींचा त्यांच्यावरील विश्वास स्पष्ट होतो. अश्विनी वैष्णव यांनी वर्षानुवर्षे काम करून हा विश्वास संपादन केला आहे. आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये काम करणारे अश्विनी वैष्णव यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिवही राहिलेले आहेत.

    वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, राजस्थानमधील जोधपूर येथे जन्मलेले 51 वर्षीय वैष्णव हे 1994च्या बॅचचे ओडिशा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत.

    ओडिशात राज्यसभा निवडणुका जिंकले

    दोन वर्षांपूर्वी अश्विनी वैष्णव यांनी ओडिशा येथून राज्यसभेच्या निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तेथे त्यांचा विजय खूप चर्चिला गेला, कारण निवडणुकीत जिंकण्यासाठी पक्षाकडे पुरेसे आमदार नव्हते. भाजपमध्ये असूनही त्यांनी राज्यसभा निवडणुकीत ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांचा पाठिंबा मिळविला. यावर बीजदमधील अनेक नेत्यांनी टीका केली होती. असा आरोप केला गेला की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाला पटनाईक बळी पडून त्यांनी वैष्णव यांचे समर्थन केले. 28 जून 2019 रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या सहा दिवस आधी वैष्णव भाजपमध्ये दाखल झाले होते.

    चक्रीवादळादरम्यान दाखवले कौशल्य

    प्रशासकीय सेवेत असताना अश्‍विनी वैष्णव यांनी बालेश्वर आणि कटक जिल्ह्यातील जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली. 1999 मध्ये झालेल्या चक्रीवादळादरम्यान त्यांनी सनदी अधिकारी म्हणून आपले कौशल्य दाखविले आणि त्यांच्या माहितीच्या आधारे सरकारने त्वरित पावले उचलल्यामुळे अनेकांचे जीव वाचले.

    वाजपेयी यांचे सेक्रेटरीही होते वैष्णव

    वैष्णव यांनी 2003 पर्यंत ओडिशामध्ये काम केले आणि त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उपसचिव झाले. वाजपेयी पंतप्रधानपदावरून हटले तेव्हा वैष्णव यांना त्यांचे सचिव बनविण्यात आले.

    आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या वैष्णव यांनी 2008 मध्ये सरकारी नोकरी सोडली आणि अमेरिकेच्या व्हार्टन विद्यापीठातून एमबीए केले. परत आल्यानंतर त्यांनी काही मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आणि त्यानंतर गुजरातमध्ये ऑटो अ‍ॅक्सेसरीजची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स स्थापन केली. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून नेमण्यात आले होते.

    Ashwini Vaishnav Profile Know About EX IAS, Vajpayees PS Vaishnav now in Modi Cabinet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन!

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!