विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधानीतील रामलीला मैदानावर दणकेबाज कार्यक्रम घेऊन दिल्लीवासीयांसाठी नवी घोषणा दिली, “आपदा” को नही सहेंगे, बदल कर रहेंगे!!, ही विधानसभा निवडणुकीसाठी महा घोषणा ठरली.
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आज हजारो करोडोच्या योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राजधानीत केले. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतील 1675 फ्लॅटचे वितरण त्यांनी केले. दिल्ली वर्ल्ड ट्रेड सेंटर, सीबीएससी अत्याधुनिक कार्यालय यांचे उद्घाटन केले. दिल्ली विद्यापीठाच्या पूर्व – पश्चिम कॅम्पसचा शिलान्यास आणि नजफगड मध्ये वीर सावरकर कॉलेजचा शिलान्यास पंतप्रधानांनी केला. त्यानंतर अशोक विहार मध्ये रामलीला मैदानावर मोदींची जाहीर सभा झाली. त्याला दिल्लीतल्या जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.
यावेळी मोदींनी आम आदमी पार्टी सरकारचे वाभाडे काढले.
– पंतप्रधान मोदी म्हणाले :
– अण्णा हजारेंसारख्या समाजसेवकाला पुढे करून कट्टर बेईमान लोकांनी गेल्या 10 वर्षांमध्ये दिल्ली लुटली. दारू घोटाळ्यापासून शिक्षण घोटाळ्यापर्यंत सगळे घोटाळे केले. सर्व शिक्षा अभियानाचे केंद्र सरकार देत असलेले पैसे दिल्लीचे बेईमान सरकार पूर्ण खर्च करू शकले नाही त्यांनी दिल्लीच्या शैक्षणिक क्षेत्राचे वाटोळे केले.
– दिल्लीच्या बेईमान आपदा सरकारने यमुना सफाईत पैसे खाल्ले. दिल्लीत रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली लोकांना बेघर केले. स्वतःसाठी शीश महल बनवले. त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले, पण मोदींनी स्वतःसाठी घर बांधले नाही. लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं दिली.
– दिल्लीच्या गोरगरीब सामान्य जनतेला या आपदा सरकारने छळून घेतले. त्यांचे जीवन हराम केले. म्हणून दिल्लीच्या जनतेने आता प्रतिज्ञा केली आहे “आपदा” को नही सहेंगे, बदल कर रहेंगे!!
Ashok Vihar’s Ramlila Ground, PM Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता. आजही राहणार आहे, असं शाह यांनी ठामपणे सांगितले.
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- America : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला; न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी
- Nitish Kumar : लालूंनी नितीश कुमारांना इंडि आघाडीत परतण्याची दिली ऑफर