अशोक तंवर हिसारमधून लोकसभा खासदार आणि हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत.
विशेष प्रतिनिधी
चंडीगढ : आम आदमी पार्टी (आप) हरियाणा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष अशोक तंवर यांनी शनिवारी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.Ashok Tanwars entry into BJP is a big blow to AAP before the Haryana elections
- राजधानीतल्या अशोका हॉटेलात INDI नेत्यांची रंगली पार्टी; पण जागा वाटपाच्या खडकावर आघाडीची बोट फुटली!!
अशोक तंवर यांनी 18 जानेवारी रोजी ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अशोक तंवर हिसारमधून लोकसभा खासदार आणि हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत.
5 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतःचा पक्षही काढला, पण विशेष काही करता आले नाही. ते काही काळ ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीमध्येही राहिले. 4 एप्रिल 2022 रोजी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.