• Download App
    अशोक चव्हाणांना काय "द्यायचे" त्यांच्याकडून काय "घ्यायचे" हे केंद्रीय नेतृत्वाने ठरविले; फडणवीसांचे सूचक विधान!! Ashok chavan may be settled in central politics by giving rajyasabha ticket

    अशोक चव्हाणांना काय “द्यायचे” त्यांच्याकडून काय “घ्यायचे” हे केंद्रीय नेतृत्वाने ठरविले; फडणवीसांचे सूचक विधान!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजप कडून काय द्यायचे आणि त्यांच्याकडून भाजपसाठी काय “घ्यायचे”??, हे केंद्रीय नेतृत्वाने ठरविले आहे, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी केले अशोक चव्हाण यांनी कोणत्याही अटी शर्ती लादून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही असे वक्तव्य फडणवीस आणि अशोक चव्हाण या दोघांनीही स्पष्ट केले. Ashok chavan may be settled in central politics by giving rajyasabha ticket

    अशोक चव्हाण राज्यसभा उमेदवारी मिळण्याच्या अटीवर भाजपमध्ये गेल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले, अशोक चव्हाण यांच्यासारखा दोन वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री राहिलेले नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यावेळी त्यांना भाजपकडून काय “द्यायचे” आणि त्यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभवाचा कोणता लाभ करून घ्यायचा??, ही केंद्रीय नेतृत्वाने ठरविले आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून मार्गदर्शन घेऊनच अशोक चव्हाणांविषयी उचित निर्णय घेण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    त्यामुळे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना केंद्रीय राजकारणामध्ये भाजपकडून “सेटल” केले जाईल, असे सूचित होत आहे.


    अशोक चव्हाणांची आज भाजपमध्ये एंट्री; काँग्रेस नेते घालताहेत उरलेल्या आमदारांना आडकाठी!!


    स्वतः अशोक चव्हाण यांनी देखील या पत्रकार परिषदेत फडणवीसांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. कोणत्याही पदासाठी नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासात्मक दृष्टीकडे आकर्षित होऊन आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो, असे अशोक चव्हाण म्हणाले. आदर्श घोटाळ्यासंदर्भातला प्रश्न सुरुवातीला यायला हवा होता. पण तो उशिरा आला, असा टोमणा त्यांनी पत्रकारांना हाणला.

    पण आदर्श घोटाळ्यासंदर्भात हायकोर्टात आपल्याच बाजूने निकाल लागला आहे. समोरचा पक्ष त्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेला असला तरी जी काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडायची ती पार पडेल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

    काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय वैयक्तिक होता जुन्या पक्षातल्या कोणत्याही नेत्यांबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचे कारण नाही. तिथे आपण प्रामाणिकपणे काम केले. आता भाजपमध्ये येऊन देखील प्रामाणिकपणेच काम करू, अशी ग्वाही अशोक चव्हाण यांनी दिली.

    – फडणवीस – बावनकुळे बघून घेतील

    पण अशोक चव्हाण यांनी देखील एक सूचक वक्तव्य केले माझ्याबरोबर आता तरी अमर राजुरकर आलेत. बाकी कोणी आले नाहीत. तो सगळा विषय देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेच पाहतील. मी आत्ता सध्या भाजप पक्षात नवीन आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. पण त्यामुळे काँग्रेस मधल्या पुढच्या राजकीय भूकंपाची नांदीच त्यांच्या तोंडून वदवली गेली.

    Ashok chavan may be settled in central politics by giving rajyasabha ticket

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!