विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : या भारतात एक दिवस असा येईल की त्या दिवशी एक हिजाब घातलेली महिला या देशाची पंतप्रधान होईल, असे “दिवास्वप्न” AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतः पाहिले आणि नंतर ते देशाला दाखविले. पण त्याच वेळी त्यांनी हा देश सेक्युलर होता सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील, असाही दावा केला. Asaduddin Owaisi: India’s first Muslim prime minister will be a woman in a hijab
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असदुद्दीन ओवैसी यांनी भरपूर राजकीय मुक्ताफळे उधळली. ओवैसी यांचा पक्ष देशभरात मुस्लिम बहुल भागात फक्त 40 पेक्षा अधिक जागा लढवतो आहे, तरीदेखील त्यांनी हिजाब घातलेली महिला पंतप्रधान बनण्याचे दिवास्वप्न बघितले आहे.
ओवैसी म्हणाले :
देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली या मोठ्या राज्यांमध्ये कुठल्याच राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्षांनी लोकसभेच्या एकाही मतदारसंघात मुस्लिम उमेदवारच दिला नाही. याचे कारण त्यांना मुस्लिम प्रतिनिधित्वाच्या विषयी आस्था नाही. त्यांना फक्त मुसलमानांची मते हवी आहेत. मग मुस्लिम आमदार – खासदार नाही झालेत तरी चालतील, अशी त्यांची धारणा आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेली असली, तरी ती मूळात हिंदुत्ववादीच पक्ष आहेत. त्यांच्याच शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने मुंबई दंगलीतला न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल फेटाळला होता. श्रीकृष्ण आयोगाने दंगलखोरांची नावे जाहीर करून त्यांना शिक्षा देण्याची शिफारस केली होती. पण मुंबई दंगलीतल्या आरोपींना युती सरकारनेच क्लीन चीट दिली होती. आज उद्धव ठाकरे सेक्युलर असल्याचे बोलत आहेत, मग ते श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाचा फेरविचार करतील का?? मुंबईच्या दंगलीमध्ये मुसलमानांना मारणाऱ्यांना ते शिक्षा देतील का??
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपचा “डीएनए” मूळातच हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे ते मुस्लिम द्वेषाची भाषा कायम बोलत राहणार. भारतातल्या मुसलमानांचा त्यांच्यावर विश्वास नाही, पण मोदींना विरोध करणाऱ्या सो कॉल्ड सेक्युलर पक्षांवरही मुसलमानांचा विश्वास नाही. कारण हे सेक्युलर पक्ष फक्त मुसलमानांची मते घेतात आणि त्यांचे हक्क डावलतात. सेक्युलर पक्षांची धोरणे देखील हिंदू केंद्रितच आहेत. देशातला सगळा मीडिया हिंदू केंद्रित आहे.
पण भारत पूर्वीपासून सेक्युलर होता सेक्युलर आहे आणि सेक्युलरच राहील. या भारतात एक दिवस असा येईल की, त्या दिवशी हिजाब घातलेली मुस्लिम महिला देशाची पंतप्रधान होईल. कदाचित त्यावेळी असदुद्दीन ओवैसी जिवंत नसेल. देशातल्या काही पिढ्या खपलेल्या असतील. पण एक दिवस निश्चित हिजाब घातलेली मुस्लिम महिला देशाची पंतप्रधान होईल.
Asaduddin Owaisi: India’s first Muslim prime minister will be a woman in a hijab
महत्वाच्या बातम्या
- 10 राज्यांतील 96 जागांवर उद्या मतदान; 5 केंद्रीय मंत्री, दोन माजी क्रिकेटपटू रिंगणात; तसेच 5700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत उमेदवारही
- ठाकरे + पवारांचे माध्यमी नॅरेटिव्हचे बाऊन्सर्स; पण त्यावर फडणवीसांची सभांची सेंच्युरी!!
- रिलायन्स कॅपिटल झाले हिंदुजा समूहाचे, ‘IRDAI’नी दिली मंजुरी!
- इंदूरमध्ये काँग्रेस का मागत आहे NOTAसाठी मतं?