• Download App
    Baikunth Nath sarangi छापा पडताच अभियंत्याने खिडकीतून

    Baikunth Nath sarangi : छापा पडताच अभियंत्याने खिडकीतून ५००च्या नोटांचे गठ्ठेच फेकले!

    Baikunth Nath sarangi

    दोन कोटींहून अधिक रोख रक्कम केली जप्त


    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर: Baikunth Nath sarangi ओडिशा दक्षता मंडळाने आरडब्ल्यू विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. विभागाने अंगुल, भुवनेश्वर आणि पुरीमधील पिपिली येथे सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि सुमारे २.१ कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली.Baikunth Nath sarangi

    या कारवाईदरम्यान एक धक्कादायक घटनाही उघडकीस आली, जेव्हा सारंगीने अधिकाऱ्यांना पाहिले त्यांचवेळी त्याने त्याच्या भुवनेश्वरमधील फ्लॅटच्या खिडकीतून ५००च्या नोटांचे गठ्ठे फेकण्याचा प्रयत्न केला.



    अंगुल येथील दक्षता मंडळाच्या विशेष न्यायाधीशांनी जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे दक्षता मंडळाने ही कारवाई केली. या कारवाईत आठ उपअधीक्षक (डीएसपी), १२ निरीक्षक, सहा सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश होता. छाप्यात मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगीच्या निवासस्थान आणि कार्यालयीन ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

    छाप्यादरम्यान भुवनेश्वरमधील पीडीएन एक्झोटिका फ्लॅटमध्ये दक्षता अधिकाऱ्यांना पाहून बैकुंठनाथ सारंगीने घाबरून ५०० रुपयांच्या नोटांचे गठ्ठे खिडकीतून बाहेर फेकले. दक्षता पथकाने साक्षीदारांच्या उपस्थितीत या नोटा जप्त केल्या. अंगुल आणि भुवनेश्वरमधील ठिकाणांवरून एकूण २.१ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आणि मोजणी यंत्रांद्वारे रक्कम मोजण्याचे काम अजूनही सुरू आहे.

    As soon as the raid took place the engineer threw bundles of 500 rupee notes out the window

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Baloch Army : ‘आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे’, बलुच आर्मीचा मोठा दावा

    Lalu Yadav : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी लालू यादव यांना मोठा धक्का!

    PF UPI : पीएफ, यूपीआय ते क्रेडिट कार्ड; १ जूनपासून पैशांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार!