• Download App
    वाराणसीत पोहोचताच राहुल गांधींच्या तोंडी आली मोदींची भाषा; म्हणाले, भाजप - संघाचे लोक न्याय यात्रेत येऊन बोलले प्रेमाचीच भाषा!! As soon as he reached Varanasi, Rahul Gandhi spoke the language of Modi

    वाराणसीत पोहोचताच राहुल गांधींच्या तोंडी आली मोदींची भाषा; म्हणाले, भाजप – संघाचे लोक न्याय यात्रेत येऊन बोलले प्रेमाचीच भाषा!!

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : वाराणसीत पोहोचताच राहुल गांधींच्या तोंडी आली मोदींची भाषा; म्हणाले भाजप संघाचे लोक न्याय यात्रेत येऊन बोलले प्रेमाचीच भाषा!!, असे खरंच आज वाराणसीत घडले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली आणि राहुल गांधींच्या तोंडी पंतप्रधान मोदींच्याच नेहमीच्या भाषणातली भाषा आली. As soon as he reached Varanasi, Rahul Gandhi spoke the language of Modi

    राहुल गांधी म्हणाले, भारत जोडून न्याय यात्रेच्या सगळ्या मार्गात मला कुठेच नफरत दिसली नाही. भाजप आणि संघाचे लोक न्यायात्रेत येऊन आमच्याशी प्रेमानेच बोलले. हा देश मुळातच प्रेमाचा देश आहे. इथे नफरत चालत नाही. जेव्हा सगळे मिळून एकत्र येऊन काम करतात तेव्हा हा देश मजबूत होतो परिवारातल्या दोन भावंडांमध्ये भांडणे झाली तर परिवार कमजोर होतो त्यामुळे आपण एकमेकांमध्ये भांडण करण्यापेक्षा एकजुटीने राहू. एकमेकांशी प्रेमाने बोलू. त्यामुळे देश मजबूत होईल. देशात एकजूट करणे, एकमेकांना जोडून ठेवणे हीच खरी देशभक्ती आहे!!

    राहुल गांधींच्या या भाषणाचा व्हिडिओ सर्वत्र बाहेर झाला त्याला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसादही दिला. पण त्यामुळेच या देशात सगळीकडे प्रेमच पसरले आहे, भाजप आणि संघाचे लोक प्रेमाची भाषा बोलत आहेत, तर राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा काढलीच कशासाठी??, असा सवाल तयार झाला.

    भारत जोडो न्याय यात्रेतील आधीच्या सर्व भाषणांमध्ये राहुल गांधींनी भाजप आणि संघ यांच्यावर देशात नफरत फैलावत असल्याचा आरोप केला होता. किंबहुना गेल्या 10 वर्षांत भाजप आणि संघाने देशात नफरतीचे वातावरण तयार केले. त्या विरोधात आपण भारत जोडो न्याय यात्रा काढत असल्याचे ते म्हणाले होते. पण वाराणसी मध्ये येताच राहुल गांधींची भाषा बदलली आणि ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वळणावरच गेली. त्यामुळे मोदींचे विरोधक आणि राहुल गांधींचे हार्डकोअर समर्थक देखील बुचकळ्यात पडले.

    As soon as he reached Varanasi, Rahul Gandhi spoke the language of Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!