विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राने तब्बल 77000 नोकर भरतीचे रेकॉर्ड केले, ते देखील संपूर्ण पारदर्शकपणे, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे – फडणवीस सरकारच्या कामगिरीचे विधानसभेत वर्णन केले. As many as 77000 recruitment transparent records of Maharashtra
राज्य सरकारच्या वतीनं गट क च्या रिक्त पदांसाठी भरती (Group C Recruitment) प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग राबवविणार आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गट क च्या जागा टप्प्या टप्प्यानं एमपीएससीकडे वर्ग करणार आहोत. यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. लोकांची मागणी होती त्याप्रमाणे हा निर्णय घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं देखील याबाबत तयारी दर्शवली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी नोकरभरती परीक्षांमधील गैरप्रकाराचा हा विषय गंभीर आहे, असं म्हटलं. पण घडल काय आणि नरेटीव्ह काय आहे. मागच्या सरकारच्या काळात किती फुटलं आणि काय फुटत याची जंत्री मी आणली आहे. मात्र, त्यामध्ये जाणार नाही, असं फडणवीस म्हणाले. आता परीक्षा टीसीएसच्या केंद्रावर आणि आयबीपीएसतर्फे होतील.
पेपरफुटीच्या प्रकरणात आपण कारवाई केलेली आहे. केवळ एक गुन्हा दाखल झाला. मात्र दुसरा कुठलाही गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. आतापर्यंत आपण 75000 ची भरती घोषित केली होती. त्यापैकी सरकार आल्यानंतर 57, 452 जणांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
77000 लोकांना नोकरी दिली
आमच्या सरकारनं 77, 305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. त्यात कुठलाही घोटाळा झालेला नाही. गट क च्या जागा आपण टप्पा टप्याने भरणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 77000 पदे भरणे हा राज्याचा रेकॉर्ड आहे. यात सर्व विभाग आहेत. आपण सर्वच विभागात पदे भरली आहेत. एका सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात 1 लाख पेक्षा जास्त भरती केली, हा विक्रम आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पारदर्शक पद्धतीने भरती केली. राजेश टोपे यांनी उपस्थित केलेल्या 1000 रुपयांच्या फीच्या प्रश्नावर फडणवीस यांनी फी कमी करण्याचा विचार करू असं म्हटलं.
सर्व विभागाची यादी माझ्याकडे आहे.. टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्थांनी परीक्षा घेतल्या आहेत. पेपरफुटी बाबत जो एफआयआर झाला त्या बाबत मी बोललो आहे. आपल्याला कुठली गोष्ट लपवण्याचे कारण नाही. पारदर्शी पद्धतीने काम राज्य सरकारने केले. एखाद्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही हाणून पाडला आहे, असंही फडणवीस यांनी सांगितले.
हा जो नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो तो चुकीचा आहे.पेपर फुटी बाबत केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील कायदा करण्याचा मनोदय मागच्या अधिवेशनात केला आहे. या अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा करणार असल्याच देवेंद्र फडणवीस म्हणाले.
As many as 77000 recruitment transparent records of Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- राधाराणी वादप्रकरणी पं. प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी, दुसऱ्याला म्हटले होते राधाचा पती
- केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात राहणार; मद्य धोरणप्रकरणी CBIने केली होती अटक
- T20 world cup 2024 winner : टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवले, सूर्याच्या एका कॅचने फिरवली मॅच
- चेहऱ्याचा मुद्दा राऊतांनी घट्ट धरला; पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!!