• Download App
    Delhi दिल्लीत 2000 कोटी रुपयांचे तब्बल 560 किलो कोकेन

    Delhi : दिल्लीत 2000 कोटी रुपयांचे तब्बल 560 किलो कोकेन जप्त; 4 तस्करांना अटक

    Delhi

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Delhi दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ( cocaine ) सिंडिकेटचा पर्दाफाश केला. दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथून पोलिसांनी 560 किलो कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 2000 कोटी रुपये इतकी आहे.Delhi

    याप्रकरणी पोलिसांनी 4 तस्करांना अटक केली आहे. यातील हाशिमी मोहम्मद वारिस आणि अब्दुल नायब या दोन आरोपींकडून 400 ग्रॅम हेरॉईन आणि 160 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

    राजधानीत आतापर्यंतचा सर्वात मोठा पर्दाफाश दिल्लीतील कोकेन जप्तीची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे. या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून काम करत होते. त्यानंतर पोलिसांना ड्रग्ज पुरवठ्याबाबत माहिती मिळाली. हे तस्कर राजधानी आणि एनसीआरमध्ये या अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते.



    गोदामात ड्रग्ज लपवून ठेवले होते

    स्पेशल सेल प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले- तुषार गोयल असे एका आरोपीचे नाव आहे. तो दिल्लीतील वसंत विहार येथील रहिवासी आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र हिमांशू आणि औरंगजेबही होते. तिन्ही आरोपींना कुर्ला पश्चिम येथून रिसीव्हर भरत जैनसह पकडण्यात आले.

    तुषार, हिमांशू आणि औरंगजेब यांच्याकडून सुमारे 15 किलो कोकेन जप्त करण्यात आले. महिपालपूर एक्स्टेंशन येथील गोदामातून रिसीव्हरला पुरवठा करण्यासाठी बाहेर पडत असताना त्याला पकडण्यात आले. कुशवाह म्हणाले की, गोदामाच्या तिसऱ्या मजल्यावरून एका बॉक्समध्ये पोलिसांना 23 पोलो शर्टमध्ये कोकेन आणि मेरवाना सापडले.

    As many as 560 kg of cocaine worth Rs 2000 crore seized in Delhi; 4 traffickers arrested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य