विशेष प्रतिनिधी
मुबंई : मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर तो तुरुंगात होता. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. या प्रकरणाची तपासणी करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना संशयास्पद भूमिकेचा आक्षेप घेत या प्रकरणातून सध्या बाजूला करण्यात आलेले आहे. आता हा तपास दिल्ली एनसीबीचे विशेष पथक हाताळत आहे.
aryan khan seeks cancellation of friday attendance at NCB office
या पाश्र्वभूमीवर आपल्याला जामीन देताना घालून दिलेल्या अटीमध्ये शिथिलता मिळावी यासाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन दर शुक्रवारी एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावण्यास उपस्थित राहतो. या मधून सुटका व्हावी यासाठी त्याने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
आर्यन खान दर शुक्रवारी एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावण्यासाठी येतो तेव्हा बाहेर मिडीया आणि बघ्यांची बरीच गर्दी जमलेली असते. या गर्दीतून पोलिसांना वाट काढत त्याला कार्यालय न्यावे लागते आणि कार्यालयातून बाहेर काढावं लागतं. हाच मुद्दा त्याने आपल्या या याचिकेमध्ये नमूद केला आहे. आता या याचिकेवर एनसीबी कोणते उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
aryan khan seeks cancellation of friday attendance at NCB office
महत्त्वाच्या बातम्या
- Malik V/s Wankhede : वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी नवाब मलिकांनी हायकोर्टाल मागितली माफी
- कृषी कायद्यांविरोधातील आंदोलकांना परदेशातून मिळाला बक्कळ पैसा, कोण-कोणत्या देशांतून झाली फंडिंग? वाचा सविस्तर…
- Non-Veg Food Row : लोकांच्या पसंतीचे अन्न खाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? गुजरातेतील मांसाहाराच्या वादावर न्यायालयाचा सवाल
- Omicron : गुजरातेत आणखी दोन ओमिक्रॉन बाधितांची भर, आता रुग्णसंख्या ३ वर, रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग