• Download App
    आर्यन खानच्या सुरक्षेतही वाढ, २०ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड कारागृहातच ड्रग प्रकरणी मुक्कामAryan khan security increased at arthur road jail may shifted to special barrack says repor

    आर्यन खानच्या सुरक्षेतही वाढ, २० ऑक्टोबर पर्यंत आर्थर रोड कारागृहातच ड्रग प्रकरणी मुक्काम

    वृत्तसंस्था

    मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. Aryan khan security increased at arthur road jail may shifted to special barrack says repor

    सध्या तो मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कैद आहे. दरम्यान, तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. विशेष म्हणजे अनेक अधिकारी त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. तसेच आर्यनला स्पेशल जेलमध्ये ठेवले जाणार असल्याचेही बोललं जात आहे.

    शनिवारी २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने छापा टाकला. तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्याची रवानगी थेट आर्थर रोड कारागृहात केली.अद्याप आर्यनला जामीन मंजूर नाही. त्यामुळे येत्या २० ऑक्टोबरपर्यंत त्याला कारागृहात राहावे लागणार आहे.

    सध्या कारागृह प्रशासनाने आर्यनच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यामुळे आर्यन खानला स्पेशल बरॅकमध्ये हलवले आहे. या ठिकाणी त्याच्यावर काही अधिकारी लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे तो इतर ड्रग्जप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींसोबत बोलत नाही. त्यांना भेटतही नाही. तसेच तुरुंगातील परिस्थिती आणि जेवणाबद्दल जुळवून घेण्यास अडचणी येत आहेत. यासह इतर कारणामुळे अधिकारी त्याच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहे.


    Aaryan Khan Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश


    महिन्यातून एकदा पाठवता येते मनीऑर्डर

    आर्यन खानला कारागृहात ११ ऑक्टोबरला साडेचार हजार रुपयांची मनी ऑर्डर वडील अभिनेता शाहरुख खानने पाठवले आहेत. या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करु शकतो. तसेच तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी ४ हजार ५०० रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते.

    Aryan khan security increased at arthur road jail may shifted to special barrack says repor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य