विशेष प्रतिनिधी
मुबंई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळून लावले होते.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या तिघांनीही जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. तोवर एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्याही न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या सुनावणीदरम्यान आर्यन खान व इतर आरोपींना प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले नव्हते.
Aryan Khan remanded in judicial custody till October 30
याआधी 7 तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. ही न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपली होती. त्यानंतर ही सुनावणी करण्यात आली आहे. या वेळी आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका नाकारून मंगळावर अर्थात 26 ऑक्टोबर ही तारीख सुनावणीसाठी दिल्यामुळे त्याचा आधीच तुरुंगामधील मुक्काम वाढला होता. त्यामध्येच एनसीबी न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आर्यनच्या एकूण अडचणीत वाढ झालेली आहे असे दिसते आहे.
Aryan Khan remanded in judicial custody till October 30
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेशातील हिंदूंवरचे हल्ले “छोट्या घटना”; इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या महासंचालकांचे वादग्रस्त वक्तव्य
- औरंगाबादमध्ये हुतात्मा पोलिसांना अभिवादन; शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात कार्यक्रम
- Nepal Floods : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार, 77 जण ठार, अनेक जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू
- धर्मांतरप्रकरणी अडकलेल्या IAS इफ्तिखरुद्दीन यांना निलंबित करणार योगी सरकार, एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासे