वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडली नसल्याचा बातम्या आल्या आहेत. स्पेशल इनव्हीस्टिगेशन टीमच्या तपासाच्या निष्कर्षात याचा खुलासा करण्यात आला आहे, असे दावे काही प्रसार माध्यमांनी केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याबाबत स्पष्ट खुलासा केला आहे. aryan khan drugs case is still under invistigation, says ncb chief sanjay singh
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आणि तपास अद्याप सुरू आहे. अनेकांची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात येत आहेत. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडली नाहीत किंवा तो कथित स्वरूपात निर्दोष असल्याचा निष्कर्ष काढणे सर्वस्वी चूक आहे, असा खुलासा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख तपास अधिकारी संजय सिंग यांनी केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या हवाल्याने अनेक मराठी वृत्त वाहिन्यांनी आर्यन खानकडे ड्रग्ज सापडली नसल्याचा निष्कर्ष एसआयटीने काढल्याच्या बातम्या दिल्या आहेत. त्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपास प्रमुखांनी स्पष्ट खुलासा करून आर्यन खान बाबत कोणताही निष्कर्ष काढला नसल्याचा खुलासा केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मराठी वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांच्या आधारावरच प्रतिक्रिया व्यक्त करून आर्यन निर्दोष असल्याचा दावा केला तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्याला फसविल्याचा दावा केला होता. पण आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तपास प्रमुख संजय सिंग यांनी स्पष्ट खुलासा केल्यामुळे आर्यन खानकडे ड्रग्ज सापडली नसल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
aryan khan drugs case is still under invistigation, says ncb chief sanjay singh
महत्त्वाच्या बातम्या
- महिलेचा मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; दोन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधानाने प्राण वाचवले
- नागपूर बनले सिटी ऑफ जॉय ;महिन्यात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही; पोलिस आयुक्तांनी मानले नागपूरकरांचे आभार
- पुतिनना “हुकूमशहा” संबोधत बायडेन म्हणाले, रशिया – युक्रेन युद्धात अमेरिका उतरणार नाही!!
- पब्जी गेमचा नाद ठरला घातक; किरकोळ कारणावरून ठाण्यात मित्राची केली हत्या