• Download App
    अरविंद केजरीवाल यांनी केली दहशतवादाची "अजब व्याख्या"...!! कोणती ती वाचा...Arvind Kejriwal's Strange Definition of Terroris"

    अरविंद केजरीवाल यांनी केली दहशतवादाची “अजब व्याख्या”…!! कोणती ती वाचा…

    वृत्तसंस्था

    लखनौ : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे खलिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्यावरुन अडचणीत आले असताना त्यांनी दहशतवादा संदर्भात अजब व्याख्या तयार केली आहे. ती त्यांनी लखनौतल्या या जाहीर सभेत ऐकवली.Arvind Kejriwal’s Strange Definition of Terroris”

    अरविंद केजरीवाल म्हणाले, की दहशतवादी दोन प्रकारचे असतात. एक दहशतवादी जनतेला घाबरवतो आणि दुसरा दहशतवादी भ्रष्टाचार्‍यांना घाबरवतो. शोले मधला डायलॉग देखील त्यांनी यावेळी ऐकवला. शोले मध्ये रडणाऱ्या मुलाला आई म्हणायची रडणे थांबव बेटा नाहीतर गब्बर आ जायेगा!! तसं माझ्या बाबतीत आता बोललं जातयं भ्रष्टाचार थांबवा नाही तर आतंकवादी केजरीवाल आ जाएगा!!, अशी डायलॉगबाजी केजरीवाल यांनी केली.

    अरविंद केजरीवाल यांची ही दहशतवादाची अजब व्याख्या ऐकून सोशल मीडियावर त्याची त्यांची जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे. त्याची वेगवेगळी मिम्स तयार केली जात आहेत.

    – कुमार विश्वास यांच्या मूळ प्रश्नाला बगल

    त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे माजी नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा खालिस्तानी संदर्भ दिला होता त्याबद्दल मात्र केजरीवालांनी कोणतेही उत्तर दिले नाही. पंजाब मध्ये समाजात फुट पाडून आम आदमी पार्टी जिंकू शकेल आणि मी मुख्यमंत्री होईन आणि नाहीच जमले तर स्वतंत्र खलिस्तानचा पहिला पंतप्रधान होईन, असे वक्तव्य केजरीवालांनी केल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला होता. माझे वक्तव्य खोडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी केजरीवाल यांना दिले होते. त्यावर केजरीवाल यांनी दहशतवादाची नवी व्याख्या ऐकवून कुमार विश्वास यांच्या मूळ प्रश्‍नाला बगल दिली आहे.

    Arvind Kejriwal’s Strange Definition of Terroris”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार