विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची ताकद वाढविण्यात मोठी भूमिका असलेले भगवंत मान यांचा केसाने गळा कापण्याचा डाव अरविंद केजरीवाल यांनी टाकला आहे. मान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता आता थेट जनतेकडून उमेदवार निवडण्याचे ठरविले आहे.Arvind Kejriwal’s plot to cut Bhagwant Mann’s CMship, votes sought from people for Punjab CM
पंजाबसाठी आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी केजरीवाल यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. मतदारांना त्यांच्या आवडीच्या उमेदवाराचे नाव सांगण्यासाठी पक्षाकडून एक मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावर ते आपल्या मनातील उमेदवाराचे नाव नोंदवू शकतात.
ही सगळी टेलिव्होटिंगची प्रक्रिया पार पडल्यानंतर येत्या सतरा जानेवारी रोजी आम्ही पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू, अशी घोषणा पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
मान यांनाही पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मत मांडता आलेले नाही. त्यांनी म्हटले आहे की, एखाद्या पक्षाने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जनतेला निवडू देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपने या निमित्ताने एक पोस्टर देखील लाँच केले असून त्यावर जनता चुनेंगी अपना सीएम अशी टॅगलाईन असून कॉल करा असे आवाहन केले आहे.
मान यांची समजूत घालताना केजरीवाल म्हणाले, भगवंत मान हे माझ्या छोट्या भावासारखे आहेत. आम आदमी पक्षाचे ते मोठे नेते आहेत. तेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असावेत अशी माझी देखील इच्छा आहे पण त्यांनीच याला नकार दिला. लोकांनी मुख्यमंत्री निवडावा अशी त्यांची इच्छा आहे. या मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये मी उतरलेलो नाही.
Arvind Kejriwal’s plot to cut Bhagwant Mann’s CMship, votes sought from people for Punjab CM
महत्त्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार विधानसभेची निवडणूक
- संजय राऊत म्हणाले, योगी आदित्यनाथांच्या विरोधात म्हणून नव्हे तर अयोध्येत लढणार शिवसेना
- बहुजन समाज पक्षाने ६७ लाख रुपये घेऊनही तिकिट दिले नाहीच, संतप्त उमेदवाराचा मायावतींच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा
- मराठी पाट्यांच्या राज्य सरकारच्या निर्णयाला व्यापारी संघटनांनी केला विरोध
- लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा; डॉ. प्रतीत समदानी यांची माहिती