विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या काही मंत्र्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट म्हणजे फार मोठे विरोधी ऐक्य साधण्यासाठी नसून स्वतःचे दिल्ली सरकार केंद्र सरकारच्या कायदेशीर बडग्यापासून वाचविण्यासाठी असलेली धडपडच असल्याचे स्पष्ट होत आहे.Arvind kejriwal’s meetings with Thackeray and Pawar not for opposition unity, but to save his own government from clutches of central government
अरविंद केजरीवालांनी भगवंत मान, आतिशी, खासदार राघव चड्ढा यांच्यासह काल उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही भेटींमध्ये प्रमुख मुद्दा चर्चेचा होता, तो म्हणजे केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश राज्यसभेत पराभूत करण्याचा. दिल्ली सरकार हे पूर्ण राज्य सरकार नव्हे, त्यामुळे सरकारने स्वतःच्या अधिकार कक्षेबाहेर जाऊन काही बदल्या केल्या, तर त्या रद्द करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे, अशा आशयाचा अध्यादेश केंद्रातील मोदी सरकारने काढला आहे. या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयाची पार्श्वभूमी देखील आहे.
पण हा अध्यादेश केंद्र सरकारचे राज्य सरकारवर अतिक्रमण असून राज्य सरकारचा देशातल्या राज्य सरकारांची अधिकार हानी करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी सध्या देशाचा दौरा आरंभला आहे. त्यांनी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि काल उद्धव ठाकरे आणि आज शरद पवार यांची भेट घेतली. या तिन्ही भेटींमधून त्यांनी फक्त केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा मुद्दा लावून धरला. या वेळी बाकी विरोधी ऐक्यावर फार मोठी या भेटीगाठींमध्ये चर्चा झालेली नाही.
केजरीवालांच्या या राजकीय भेटीगाठी विरोधी ऐक्याची चर्चा घडवून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय देण्यापेक्षा स्वतःचे दिल्ली सरकार केंद्र सरकारच्या कायदेशीर बडग्यापासून वाचविण्यासाठीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केजरीवालांना दिलेले आश्वासन पवार पाळणार??
शरद पवारांनी केजरीवालांना राज्यसभेत केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात मतदान करण्याचे आश्वासन दिले आहे. आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस केजरीवालांना दिलेले आश्वासन कितपत पाळेल??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Arvind kejriwal’s meetings with Thackeray and Pawar not for opposition unity, but to save his own government from clutches of central government
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!