नाशिक : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या लोकप्रियतेच्या वारूवर स्वार होत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची गादी मिळवणाऱ्या अरविंद केजरीवालांचे पुरते “इंदिरा गांधीकरण” झाले आहे. शेकडो कोटींच्या दारू घोटाळ्यात भले ते तुरुंगाची वारी करतील, पण दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडणार नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा आम आदमी पार्टीच्या दिल्ली विधिमंडळ पक्षाने दिला आहे. Arvind kejriwal will not quit chief ministers post, after arrest, as Indira Gandhi didn’t quit prime ministers post after allahabad high court verdict
आम आदमी पार्टीच्या दिल्ली विधिमंडळ पक्षाची अरविंद केजरीवाल यांच्या समवेत बैठक झाली आणि सर्व विधिमंडळ पक्षाने म्हणजेच सर्व आमदारांनी अरविंद केजरीवालांना राजीनामा देऊ नका, असे स्पष्ट सांगितले. शेकडो कोटींच्या दारू घोटाळ्यात भले केंद्रातले मोदी सरकार अरविंद केजरीवालांना तुरुंगात डांबेल. ते तुरुंगात जातीलही, पण तरी देखील ते मुख्यमंत्री पद सोडणार नाहीत, असे दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी पत्रकारांना सांगितले. मोदी सरकारने अरविंद केजरीवालांना खोट्या आरोपांखाली अडकवायचे ठरवले आहे. त्यामुळेच ईडी चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. पण आम आदमी पार्टी डरणार नाही. आप अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी ठाम उभी राहील. त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ देणार नाही, असे आतिशी यांनी स्पष्ट केले.
अरविंद केजरीवालांच्या पाठीशी उभी राहण्याची आम आदमी पार्टीची नेमकी हीच भूमिका म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे “इंदिरा गांधीकरण” आहे.
– इंदिराजींच्या पाठीशीही संसदीय काँग्रेस पक्ष
12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय इंदिरा गांधींच्या विरोधात गेल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. पण इंदिरा गांधींना पंतप्रधानपद सोडायचे नव्हते म्हणून त्यांच्याच छुप्या प्रोत्साहनातून काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला पर्याय नसल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये, असा ठराव करण्यात आला. या ठरावाची प्रत घेऊन काँग्रेसचे त्यावेळेसचे अध्यक्ष देवकांत बरूआ, केंद्रीय मंत्री बाबू जगजीवन राम आणि यशवंतराव चव्हाण हे तीन वरिष्ठ काँग्रेस नेते इंदिरा गांधींच्या 1 सफदरजंग रोड या निवासस्थानी गेले होते.
पण इंदिरा गांधींचे केवळ संसदीय मंडळातल्या नेत्यांवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण संसदीय काँग्रेस पक्षाची बैठक बोलवायला लावली आणि त्या बैठकीत आपल्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब पुन्हा करवून घेतले. या बैठकीतच काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरूआ यांनी त्यांची कुप्रसिद्ध, “इंदिरा इज इंडिया” आणि “इंडिया इज इंदिरा” ही घोषणा दिली होती. याच बैठकीत यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, इंदिरा गांधी आमच्या नेते आहेत यापुढेही त्याच नेत्या राहणार इंदिरा गांधी आमच्या पंतप्रधान आहेत यापुढेही इंदिरा गांधीच पंतप्रधान राहणार!!” काँग्रेस नेत्यांची लाचारीची ही परिसीमा होती, असे परखड निरीक्षण प्रख्यात लेखक आणि पत्रकार वि. स. वाळिंबे यांनी “बंगलोर ते रायबरेली” आपल्या पुस्तकात नोंदविले आहे.
आपल्याला संसदीय काँग्रेस पक्षाचा म्हणजेच सर्व खासदारांचा भरभक्कम पाठिंबा आहे हे दाखवून इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे टाळले होते. पण जेव्हा सर्व प्रकरण राजकीय दृष्ट्या गळ्याशी आले, तेव्हा पंतप्रधान पद न सोडता इंदिरा गांधींनी संपूर्ण देशावर 1975 मध्ये आणीबाणी लादली होती. त्या आणीबाणीला यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवन राम, सरदार स्वर्ण सिंह यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री देखील विरोध करू शकले नव्हते.
केजरीवालांच्या पत्नीला आपचा विरोध
आता देखील अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीवर इंदिरा गांधींसारखीच राजकीय पकड आहे. शिवाय ते तुरुंगात गेले तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला दिल्लीची मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा मनसूबा होता. मात्र आम आदमी पार्टीच्या बहुसंख्य आमदारांनी हा मनसूबा हाणून पाडल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळेच आपण तुरुंगात गेलो तर अन्य कुठलाही नेता मुख्यमंत्री करायचा नाही हे अरविंद केजरीवालांनी ठरविल्याची अटकळ बांधली जात आहे. म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधींप्रमाणेच प्रोत्साहन देऊन आम आदमी पार्टीच्या दिल्ली विधिमंडळ पक्षाची बैठक भरवली आणि आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून घेत आपल्याला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचा ठराव संमत करून घेतला.
अरविंद केजरीवालांची राजकीय कारकीर्द काँग्रेस विरोधात अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून सुरू झाली आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा अंतपूर्व मध्य त्यांच्या स्वतःच्याच “इंदिरा गांधीकरणाने” होत आहे.
Arvind kejriwal will not quit chief ministers post, after arrest, as Indira Gandhi didn’t quit prime ministers post after allahabad high court verdict
महत्वाच्या बातम्या
- जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; ‘ED’ची कारवाई
- बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता
- श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स! श्रद्धा च्या आश्वासनामुळे श्रद्धाच होते कौतुक!
- क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर पुतळा; सी. के. नायडूंनंतर सचिनला मिळाला मान आगळा !!