विशेष प्रतिनिधी
लखनौ : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात केजरीवालांनी आपला “शब्द” “पाळत” आपला पीए बिभव कुमार याच्यावर “कठोर” “कारवाई” केली!!… लखनौ दौऱ्यामध्ये त्याला आपल्या सांगाती घेतला. त्याचे फोटो आता सगळीकडे व्हायरल झाले. लखनौ विमानतळावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री केजरीवाल यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार संजय सिंग आणि पीए बिभव कुमार हे देखील होते. Arvind kejriwal took bibhav Kumar accused in swati maliwal assault case with him on lucknow tour
दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासात राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी मारहाण केली. त्यावेळी स्वतः केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल तिथे हजर होते. त्यांची आणि स्वाती मालीवाल यांची जोरदार भांडण झाली. केजरीवालांनाही दोन थापडा बसल्या. त्यानंतर बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांना धक्का देऊन त्यांना खाली पाडले आणि फरफटवत नेले, अशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. युट्युब वर शेकड्यांनी व्हिडिओ आले. दिल्लीच्या राजकारणात प्रचंड गदारोळ उठला. स्वाती मालीवाल यांचे आधीचे पती नवीन जयहिंद यांनी स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला.
स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याचे बिंग फुटल्यानंतर 30 तासांनी खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन बिभव कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश अरविंद केजरीवालांनी दिल्याचे जाहीर केले. ती “कठोर” “कारवाई” लखनौच्या विमानतळावर दिसली. केजरीवाल यांच्या समवेत बिभव कुमार लखनौच्या विमानतळावर पोहोचले. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांचे तिथे स्वागत केले. त्या फोटोत त्यांच्यासमवेत खासदार संजय सिंग आणि बिभव कुमार हे देखील दिसले.
– केजरीवालांनी माईक सरकवले
अरविंद केजरीवाल आज लखनौमध्ये अखिलेश यादव यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय सिंग त्यांच्या समवेत होते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात नेमके काय घडले??, याविषयी अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पण त्या प्रश्नांना उत्तरे देणे ऐवजी केजरीवाल यांनी स्वतः समोरचे 2 माईक आधी अखिलेश यादव यांच्याकडे सरकवले आणि नंतर संजय सिंग यांच्याकडे सरकवले. केजरीवाल यांनी स्वाती मारहाण स्वाती मालेवाल मारहाण प्रकरणाची उत्तरे द्यायला नकार दिला. त्यांच्या ऐवजी संजय सिंग यांनी विषय भरकवटत उत्तरे दिली.
मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, त्यावेळी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलले नाहीत. कर्नाटकात प्रज्ज्वल रेवण्णा याने शेकडो महिलांवर बलात्कार केले. मोदी त्याच्यासाठी मते मागत आहेत. मोदी महिला अत्याचारावर गप्प बसतात, असे आरोप संजय सिंग यांनी केले. आम आदमी पार्टी हा आमचा परिवार आहे. परिवारातले प्रश्न आम्ही परिवारात सोडवू अशी मखलाशी त्यांनी केली. परंतु अरविंद केजरीवालांनी स्वाती मालीवाल प्रकरणावर तोंड देखील उघडले नाही.