Friday, 2 May 2025
  • Download App
    Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल चौथ्यांदा नवी दिल्लीतून नि

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल चौथ्यांदा नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार; ‘आप’च्या चौथ्या यादीत 38 नावे

    Arvind Kejriwal

    Arvind Kejriwal

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Arvind Kejriwal  दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची (AAP) चौथी आणि अंतिम यादी आली आहे. त्यात 38 नावे आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. कालकाजीमधून सीएम आतिशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलासमधून तर सत्येंद्र जैन हे शकूर बस्तीमधून निवडणूक लढवणार आहेत.Arvind Kejriwal

    पहिल्या यादीत 11, दुसऱ्या यादीत 20 आणि तिसऱ्या यादीत एका उमेदवाराची नावे होती.

    9 डिसेंबर रोजी 20 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत 17 विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द करण्यात आली. 3 उमेदवारांच्या जागा बदलण्यात आल्या. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी ते पटपडगंजमधून निवडणूक लढवत होते. AAP ने पटपडगंजमधून UPSC शिक्षक अवध ओझा यांना उमेदवारी दिली आहे. ओझा यांनी 2 डिसेंबर रोजीच पक्षात प्रवेश केला होता.



    प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी ‘आप’ने तिमारपूरचे विद्यमान आमदार दिलीप पांडे यांचे तिकीट रद्द केले आहे. त्यांच्या जागी दोन दिवसांपूर्वी भाजपमधून ‘आप’मध्ये दाखल झालेले सुरेंद्र पाल सिंह बिट्टू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    ‘आप’ची पहिली यादी २१ नोव्हेंबरला आली होती, ज्यात ११ उमेदवारांची नावे होती. यामध्ये भाजप-काँग्रेसच्या 6 जणांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये भाजपच्या ३ आणि काँग्रेसच्या ३ चेहऱ्यांचा समावेश आहे.

    पहिल्या यादीत भाजपच्या 6 पैकी 3, काँग्रेसच्या 3 नेत्यांची नावे

    ‘आप’ने 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यादीत 11 नावे आहेत. यामध्ये भाजप किंवा काँग्रेस सोडून ‘आप’मध्ये दाखल झालेले सहा नेते आहेत. ब्रह्मसिंह तंवर, बीबी त्यागी आणि अनिल झा यांनी नुकतेच भाजप सोडले होते. तर झुबेर चौधरी, वीरसिंग धिंगण आणि सुमेश शौकीन यांनी काँग्रेसमधून आपमध्ये प्रवेश केला आहे.

    दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. सध्याच्या सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या तारखेपूर्वी निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतो.

    Arvind Kejriwal to contest elections from New Delhi for the fourth time; 38 names in AAP’s fourth list

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!

    ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप

    Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!