• Download App
    Arvind kejriwal सुप्रीम कोर्टाने नाड्या आवळल्यावर केजरीवालांची राजीनाम्याची तयारी

    Arvind kejriwal सुप्रीम कोर्टाने नाड्या आवळल्यावर केजरीवालांची राजीनाम्याची तयारी, पण प्रत्यक्षात राजकीय हौतात्म्याची नौटंकी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर अरविंद केजरीवाल दोनच दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आले. परंतु सुप्रीम कोर्टाने राजकीय दृष्ट्या त्यांच्या नाड्या पूर्ण आवळल्यानंतर आज त्यांना राजीनामा देण्याची घोषणा करण्याची वेळ आली. अरविंद केजरीवालांनी दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात ती राजकीय हौतात्म्याची नौटंकी ठरली.

    दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सत्त्वसुली संचना आलाय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवालांनी राजीनामा देऊन ते चौकशी आणि तपासाला सामोरे गेले असते तर ती नौटंकी ठरली नसती. त्यामागे लोकांना त्यांचा प्रामाणिक हे तो दिसला असता. परंतु अरविंद केजरीवाल्यांनी अटकेनंतर राजीनामा दिला नाही. ते गेले 5 महिने तुरुंगात राहिले, पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांनी सोडली नाही.

    सुरुवातीला राऊत अवेन्यू कोर्टाने नंतर दिल्ली हायकोर्टाने आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून काम करण्यावर भरपूर प्रतिबंध लादले. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. कुठल्याही सरकारी सुविधा वापरता येणार नाहीत, असे बंधन घातले. परंतु अरविंद केजरीवालांनी तेव्हा देखील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली नाही. आता सुप्रीम कोर्टाने केजरीवालांचा जामीन मंजूर करताना त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायची उपरती झाली.


    JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध


    पण अजून देखील केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडलेली नाही, तर त्यांनी फक्त राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पण एवढ्या घोषणेनंतरच माध्यमांनी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री पदाच्या नावांचे पतंग उडवायला सुरुवात केली. सुनीता केजरीवाल, मनीष सिसोदिया, अतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज यांची नावे माध्यमांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणली. पण केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, तरच यापैकी कोणाला तरी संधी मिळणार आहे. अन्यथा ती संधी हवतच तरंगणारी ठरणार आहे.

    केजरीवाल लवकरच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. या प्रचारात ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या हौतात्म्याच्या बातमीचाही उपयोग करून घेतील, अशा अटकळी आत्तापासूनच राजकीय वर्तुळात बांधल्या जाऊ लागल्या आहेत.

    Arvind kejriwal resignation offer, a political drama

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Priyanka Gandhi : प्रियंका गांधी म्हणाल्या- गौरव गोगोई योग्य मार्गावर, हिमंता निवडणुकीला घाबरले, म्हणून आरोप

    राज्यसभेसाठी अजितदादांची पसंती कुणाला??, शरद पवारांना की छगन भुजबळांना??; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून परस्पर विरोधी दावे

    UK-US Tension : ब्रिटनचा अमेरिकेला आपले हवाई तळ देण्यास नकार; इराणवर हल्ल्यासाठी यांची गरज; चागोस बेटांवरून अमेरिका-ब्रिटनमध्ये तणाव