• Download App
    स्वाती मालीवाल मारहाणीवर पत्रकारांनी प्रश्न विचारले; केजरीवालांनी आपल्यासमोरचे माईक माईक अखिलेश + संजय सिंग यांच्याकडे सरकवले!! Arvind Kejriwal refuses to answer when asked about AAP Rajya Sabha MP Swati Maliwal's assault case.

    स्वाती मालीवाल मारहाणीवर पत्रकारांनी प्रश्न विचारले; केजरीवालांनी आपल्यासमोरचे माईक माईक अखिलेश + संजय सिंग यांच्याकडे सरकवले!!

    वृत्तसंस्था

    लखनौ : दिल्लीच्या राजकारणात प्रचंड गदारोळ उठलेल्या स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावर लखनऊ मधल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अरविंद केजरीवालांना प्रश्न विचारले. पण हे प्रश्न विचारताच केजरीवालांनी आपल्यासमोरचे दोन्ही माईक आधी अखिलेश यादवांकडे आणि नंतर संजय सिंगांकडे सरकवले. स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे केजरीवाल यांनी टाळले. त्या प्रकरणापेक्षाही बाकीचे विषय महत्त्वाचे असल्याची मखलाशी अखिलेश यादव यांनी केली. Arvind Kejriwal refuses to answer when asked about AAP Rajya Sabha MP Swati Maliwal’s assault case.

    दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासात राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी मारहाण केली. त्यावेळी स्वतः केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल तिथे हजर होते. त्यांची आणि स्वाती मालीवाल यांची जोरदार भांडण झाली. केजरीवालांनाही दोन थापडा बसल्या. त्यानंतर बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांना धक्का देऊन त्यांना खाली पाडले आणि फरफटवत नेले, अशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. युट्युब वर शेकड्यांनी व्हिडिओ आले. दिल्लीच्या राजकारणात प्रचंड गदारोळ उठला. स्वाती मालीवाल यांचे आधीचे पती नवीन जयहिंद यांनी स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला.

    या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल आज प्रचाराच्या निमित्ताने लखनऊ मध्ये पोहोचले. तेथे त्यांनी अखिलेश यादव यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आम आदमी पार्टीचे दारू घोटाळ्यातच अडकलेले पण जामीनावर सुटलेले खासदार संजय सिंग त्यांच्या समवेत होते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात नेमके काय घडले??, याविषयी अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पण त्या प्रश्नांना उत्तरे देणे ऐवजी केजरीवाल यांनी स्वतः समोरचे 2 माईक आधी अखिलेश यादव यांच्याकडे सरकवले आणि नंतर संजय सिंग यांच्याकडे सरकवले. केजरीवाल यांनी स्वाती मारहाण स्वाती मालेवाल मारहाण प्रकरणाची उत्तरे द्यायला नकार दिला. त्यांच्या ऐवजी संजय सिंग यांनी विषय भरकवटत उत्तरे दिली.

    मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, त्यावेळी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलले नाहीत. कर्नाटकात प्रज्ज्वल रेवण्णा याने शेकडो महिलांवर बलात्कार केले. मोदी त्
    त्याच्यासाठी मते मागत आहेत. मोदी महिला अत्याचारावर गप्प बसतात, असे आरोप संजय सिंग यांनी केले. आम आदमी पार्टी हा आमचा परिवार आहे. परिवारातले प्रश्न आम्ही परिवारात सोडवू अशी मखलाशी त्यांनी केली. परंतु अरविंद केजरीवालांनी स्वाती मालीवाल प्रकरणावर तोंड देखील उघडले नाही.

    Arvind Kejriwal refuses to answer when asked about AAP Rajya Sabha MP Swati Maliwal’s assault case.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!

    Iqbal Singh : भाजपचे इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर होणार; ‘आप’ निवडणुकीपासून दूर

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये ढगफुटी, श्रीनगर महामार्ग 20 फूट चिखल, शेकडो वाहने अडकली