• Download App
    मतांच्या बेगमीसाठी सुशासनाच्या घोषणेला अरविंद केजरीवाल यांची तिलांजली, मोफत यात्रांचे दिले आश्वासन|Arvind Kejriwal promises free yatra to people of all relegion

    ममतांच्या बेगमीसाठी सुशासनाच्या घोषणेला अरविंद केजरीवाल यांची तिलांजली, मोफत यात्रांचे दिले आश्वासन

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : सुशासनाची घोषणा करून आत्तापर्यंत मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता धर्माचा आधार घेतला आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जर गोव्यात आम आदमी पाटीर्ची सत्ता आली तर आमचे सरकार हिंदूंसाठी अयोध्येला आणि ख्रिश्चनांसाठी वेलनकन्नी येथे मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करेल.Arvind Kejriwal promises free yatra to people of all relegion

    मस्लिमांसाठी आम्ही अजमेर शरीफ व साई भक्तांना शिर्डी येथे मोफत दर्शन यात्रा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले आहे.यापूर्वी केजरीवाल दोन दिवसीय गोवा दौºयावर असताना, गोव्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत आपचे सरकार आल्यास ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केलेली आहे.



    गोव्यातील जनतेला आम आदमी पक्षानं चार आश्वासनं दिली आहेत. ही चारही आश्वासनं विजेशी निगडीत आहेत.केजरीवाल म्हणाले, गोवा सुदंर आहे. मात्र इथलं राजकारण खराब आहे. भाजपा आणि काँग्रेसनं मिळून जनतेची फसवणूक केली आहे.

    आमचं सरकार गोव्यात आलं तर प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल. विजेची जुनी बिले माफ केली जातील. त्याचबरोबर २४ तास वीज उपलब्ध असणार आहे. तसेच शेतकºयांनी शेतीसाठी मोफत वीज मिळेल. मी तुम्हाला शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळतो.

    Arvind Kejriwal promises free yatra to people of all relegion

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र