• Download App
    भ्रष्टाचार विरोधातल्या "मसीहा"ची तिहार जेल मधली कोठडी; वाचा बरॅक नंबर 2 ची कहाणी!!|Arvind kejriwal in tihar jail no. 2 where chota rajan and shahbuddin were lodged!!

    भ्रष्टाचार विरोधातल्या “मसीहा”ची तिहार जेल मधली कोठडी; वाचा बरॅक नंबर 2 ची कहाणी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भ्रष्टाचार विरोधातला “मसीहा” आज दिल्लीतल्या दारू घोटाळ्यातला मास्टरमाईंड ठरून तिहार जेल मधल्या बरॅक नंबर 2 मध्ये कोंडला गेला. हा बरॅक नंबर 2 साधासुधा नाही, तर तिथे “ऐरे गैरे नथू खैरे” ठेवलेच जात नाहीत. भ्रष्टाचार विरोधातल्या “मसीहा”आधी अनेक बडे – बडे “मसीहा” राहून गेले. त्यामुळे आता भ्रष्टाचार विरोधातला “मसीहा” किती मोठा किंवा बडा आहे हे बरॅक नंबर 2 आपल्याला सांगणार आहे.Arvind kejriwal in tihar jail no. 2 where chota rajan and shahbuddin were lodged!!



    अरविंद केजरीवाल यांची रवानगी तिहार जेल मधल्या बरॅक नंबर 2 मध्ये झाली. या बरॅक नंबर 2 मध्ये त्यांच्या आधी छोटा राजन आणि बिहार मधला गँगस्टर नेता शहाबुद्दीन राहून गेले होते. बरॅक नंबर 2 त्या वेळेपासूनच चर्चेत आहे आणि आता तिथे अरविंद केजरीवाल वास्तव्याला आले आहेत. अरविंद केजरीवालांची पूर्वीची प्रतिमा भ्रष्टाचार विरोधातला “मसीहा” अशी होती. पण तेच दिल्लीच्या दारू घोटाळ्याचे मास्टरमाईंड ठरले आणि त्यांना तिहार मधल्या बरॅक नंबर 2 मध्ये येऊन पडावे लागले. तिथे देखील त्यांची “हाय प्रोफाईली” कायम राहिली. कारण याच बरॅक नंबर 2 मध्ये छोटा राजन आणि गँगस्टर नेता शहाबुद्दीन राहून गेल्याने केजरीवालांचा “दर्जा” त्यांच्या एवढाच किंबहुना त्यांच्या पेक्षा जास्त ठरला.

    मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह हे केजरीवालांचे साथीदार आधीपासूनच तिहार जेलमध्ये आहेत. दिल्लीच्या एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी कडकोट बंदोबस्तात त्यांना बरॅक नंबर 2 मध्ये आणले. या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही कॅमेराची नजर असणार आहे. तिहार जेलमधील बरॅक नंबर 2 हे सर्वात सुरक्षित मानले जाते जेलच्या अधिकाऱ्यांची इथे करडी नजर राहते. कारण या बरॅकमध्ये हाय प्रोफाईल व्यक्तींनाच ठेवले जाते.

    अरविंद केजरीवाल तिहारमध्ये पोहोचण्याआधीच त्यांचे साथीदार संजय सिंह यांना बरॅक 2 मधून 5 मध्ये हलविले. मनीष सिसोदिया बरॅक नंबर 1 आणि सत्येंद्र सिंह बरॅक नंबर 7 मध्ये बंद आहेत. याशिवाय तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविताला बरॅक नंबर 6 मध्ये ठेवले आहे. विजय नायर हा जेल नंबर 4 मध्ये बंद आहेत. बरॅक नंबर 4 मध्ये श्रद्धा मर्डर केसचा आरोपी आफताब पूनावालासुद्धा कैदेत आहे.

    बरॅक नंबर 2 ची कहाणी

    तिहार जेलमधल्या बरॅक नंबर 2 ची कहाणी हाय प्रोफाईल आहे. याआधी या बरॅकमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बिहारचा बाहुबली नेता मोहम्मद शाहबुद्दीन सारख्या कुख्यात कैद्यांना ठेवले होते. त्यामुळे आता अरविंद केजरीवालांचा “दर्जा” देखील छोटा राजन आणि शहाबुद्दीन यांच्यासारखा “हाय प्रोफाईल” झाला आहे.

    त्याआधी 2017 मध्ये बिहारमधील बहुचर्चित ॲसिड हल्ला प्रकरणात माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनला जन्मठेपेची शिक्षा झाली. शहाबुद्दीनला सीवान जेलमध्ये ठेवले होतं. त्याच्यावर पत्रकार राजदेव रंजनच्या हत्येचाही आरोप आहे. राजदेव रंजन यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात आपल्या जीवाला धोका असल्याची याचिका दाखल केली होती. शहाबुद्दीनला सीवान जेलमध्ये ठेवलं तर हे प्रकरण प्रभावित होऊ शकतं असा आरोप करण्यात आला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शहाबुद्दीनला तिहार जेलमध्ये हलवले होते. इथेच आजारपणामुळे शहाबुद्दीनचा मृत्यू झाला.

    Arvind kejriwal in tihar jail no. 2 where chota rajan and shahbuddin were lodged!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य