पैसा नेमका गेला कुठे? भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वटद्वारे साधला निशाणा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी यमुना नदीच्या स्वच्छतेच्या मुद्य्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. यमुनेला लंडनच्या थेम्स प्रमाणे करण्याचे आश्वासन देणाऱ्या केजरीवालांनी पाच वर्षांत कोट्वयधी रुपये स्वच्छतेसाठी खर्चूनही युमना नदीची परिस्थिती जैसे थे आहे. Arvind Kejriwal has spent 6800 crore in the last 5 years in name of cleaning Yamuna but no one can accuse him of doing anything because Yamuna is polluted as ever Amit Malviya
या पार्श्वभूमीवर अमित मालवीय यांनी म्हटले की, ‘’अरविंद केजरीवाल यांनी मागील पाच वर्षांत यमुना स्वच्छ करण्याच्या नावाखाली तब्बल ६ हजार ८०० कोटी खर्च केले आहेत. पण यमुना नेहमीप्रमाणे प्रदूषित दिसत असल्याने, त्यांच्यावर कोणीही काहीही केल्याचा आरोप करू शकत नाही. मग सर्व पैसे कुठे गेले? केजरीवाल दिल्लीच्या तिजोरीतील पैसा अन्य उद्देशांसाठी खर्च करत आहेत का?’’
याशिवाय, “अरविंद केजरीवाल यांनी गेल्या सात वर्षात प्रदूषणाच्या जाहिरातींवर ९४० कोटी रुपये खर्च केले आहेत, परंतु समस्या सोडवण्यासाठी आणखी काही केले नाही. दिल्लीचा श्वास कोंडत आहे, पण त्यांना कोणताही प्रश्न विचारला जात नाही कारण त्यांनी मीडियाचे मौन प्रचंड खर्च करून विकत घेतले आहे आणि फटाक्यांना दोष दिला जात आहे.’’ असंही मालवीय यांनी म्हटलं आहे.
यमुना नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत रविवारी मुंडका विधानसभा मतदारसंघातील हिरण कुडना गावात महापंचायत झाली. गेल्या आठ वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करूनही यमुना नाल्यासारखी वाहत असल्याचे त्यात म्हटले आहे.
अशा परिस्थितीत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) ने नुकताच दिल्ली सरकारला ६१०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनजीटीने दिल्ली सरकारला ९०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०१५ च्या निवडणूक जाहीरनाम्यात यमुना नदीचे लंडनच्या थेम्स नदीत रूपांतर केले जाईल असे म्हटले होते, परंतु आज प्रदूषणामुळे लोक छठ पूजा साजरी करणे टाळतात.
Arvind Kejriwal has spent 6800 crore in the last 5 years in name of cleaning Yamuna Amit Malviya
महत्वाच्या बातम्या
- रामनवमीला बिहार, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचारावर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह संतापले, म्हणाले…
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा केजरीवालांवर जोरदार पलटवार म्हणाले…
- Jaishankar On Khalistan: ‘आता तो भारत नाही जो तिरंग्याचा अपमान सहन करेल’, ब्रिटनमधील ‘त्या’ घटनेवर जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया
- CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!