एक दिवस आधी मंत्रीपद आणि आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Kailash Gehlot दिल्ली सरकारमध्ये परिवहन मंत्री असलेले कैलाश गेहलोत यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी एक दिवस आधी म्हणजे रविवारीच मंत्रीपदाचा आणि आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता.Kailash Gehlot
कैलाश गेहलोत यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व घेतले. त्यांनी भाजप नेते मनोहर लाल खट्टर, दुष्यंत गौतम आणि हर्ष मल्होत्रा यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
कैलाश गेहलोत यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते कुठेही जाण्यासाठी आणि कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यास मोकळे आहेत. ती त्यांची निवड आहे.
कैलाश गेहलोत यांनी रविवारी (17 नोव्हेंबर) आम आदमी पार्टीवर मोठे आरोप करत राजीनामा दिला होता. ते म्हणाले होते की आणखी एक वेदनादायक गोष्ट म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आम्ही केवळ आमच्या राजकीय अजेंडासाठी लढत आहोत, त्यामुळे दिल्लीतील लोकांना मूलभूत सेवा देखील देण्यात अडचणी येत आहेत.
Arvind Kejriwal gets a shock Kailash Gehlot joins BJP
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar मी शरद पवार साहेबांना सोडले नाही; निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवारांचे मोठे विधान
- Baramati textile park मालवाहतुकीचे गेट ते परप्रांतीय सुरक्षा रक्षक; बारामती टेक्स्टाईल पार्कच्या “प्रतिभाताई एन्ट्रीत” वेगळाच ट्विस्ट!!
- Maitai : मैतई समुदायातील सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर
- hypersonic : हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताची ताकद जगाने पाहिली