विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरुध्द लढण्याचा नारा देऊन राजकारणात आलेले अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये नवीन दारू धोरण ठरविताना ठेके देण्यासाठी पाचशे कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप त्यांचेच जुने सहकारी कुमार विश्वास यांनी केला आहे. एकेकाळचे सहकारी असलेल्या विश्वास यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.Arvind Kejriwal accepts Rs 500 crore bribe for awarding liquor contracts, accuses old colleague poet Kumar Vishwas
केजरीवाल सरकारने लागू केलेले नवे दारू धोरणही त्यामुळे वादात सापडले आहे. कुमार विश्वास यांनी सोशल मीडियावर नव्या दारू धोरणाबाबतची बातमी ट्विट करून एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दारू पिण्यास कायदेशिर परवानगी देण्यासाठीचे वय २१ वरून १८ वर्षे करणे आणि एक हजार नवीन ठेके देण्याचे धोरण करा म्हणून २०१६ मध्ये एक दारू माफिया माझ्याकडे आला होता.
त्याच्यासोबत दारू धंद्याशी संबंधित असणारे दोन आमदारही होते. मी दोघांना हाकलून दिले होते. ‘अब छोटो वाले के साले ने ५०० करोड की डील में मामला सेट कर लिया।’ असे म्हणून त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
दिल्ली सरकारने नव्या दारू धोरणानुसार सरकार ठेक्यांपेक्षा खासगी वाईन शॉपना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. या धोरणाअंतर्गत दिल्लीमध्ये ८४९ नवी दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये तीन दारू दुकाने उघडण्याचा परवाना देण्यात आला आहे. त्याचबरोबर दारू पिण्याचे कायदेशिर वय २१ वरून कमी करून १८ वर्षे करण्यात आले आहे.
दिल्ली सरकारच्या नव्या दारू धोरणाला विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने विरोध केला आहे. १ जानेवारी रोजी याविरुध्द भाजपाने आंदोलन केले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन हजार कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
भाजपने म्हटले आहे की एका बाजुला आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये जाऊन दारूबंदीचे आश्वासन देतात; दुसऱ्या बाजुला दिल्लीमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी धोरणे करतात.कुमार विश्वास हेअरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आहेत.
दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर २०११ मध्ये झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या आयोजनात केजरीवाल आणि कुमार विश्वास हे मुख्य सूत्रधार होते. आंदोलनानंतर स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाच्या संस्थापकांपैकी दोघे आहेत. मात्र, दिल्लीमध्ये आपचे सरकार दुसऱ्यांदा आल्यावर दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाले. त्यानंतर कुमार विश्वास यांनी केजरीवालांची साथ सोडली होती.
Arvind Kejriwal accepts Rs 500 crore bribe for awarding liquor contracts, accuses old colleague poet Kumar Vishwas
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात
- आरक्षण मागण्यसाठी लढायचं होतं तेव्हा ओबीसी लढायला तयार नव्हते, जितेंद्र आव्हाडच्या ओबीसींबाबत आक्षपार्ह वक्तव्यामुळे संताप
- गोव्यातही महाविकास आघाडी, संजय राऊतांवर जबाबदारी, कॉँग्रेसकडे मागितल्या सात ते आठ जागा
- Mhada Exam : गोंधळ मिटता मिटेना ! म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर ; 29-30 जानेवारीला परीक्षा नाही