विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDI आघाडीतल्या नेत्यांचा अहंकार एवढा शिगेला पोहोचला आहे की तामिळनाडू द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते सनातन धर्माचा अपमान करतात, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसचे नेते राम मंदिराचा अपमान करू लागले आहेत.Arrogance of the INDI front; Insult of Sanatan Dharma by DMK, Insult of Ram Temple by Trinamool Congress leader!!
पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या आमदाराने अयोध्यातला राम मंदिराला “अपवित्र” म्हणून तिथे जाऊन कोणी हिंदूने पूजा करू नये, असे अपमानजनक वक्तव्य केले. रामेंदु सिन्हा असे या आमदाराच नाव आहे. तारकेश्वर येथून येणारे ते तृणमूल काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. रामेंदु सिन्हा यांच्या वक्तव्याचा चहूबाजूंनी निषेध होतोय.
तामिळनाडू मुख्यमंत्री एम के स्टाईल यांचे पुत्र राज्याचे मंत्री उदयनिधी स्टाईल यांनी सनातन धर्माला डेंगी मलेरिया रोगांची उपमा देऊन त्याच्या निर्मूलनाची धमकी दिली होती त्यावरून सुप्रीम कोर्टाने त्यांची कान उघडणे केली पण एवढे झाल्यानंतरही त्यांच्या इंडिया आघाडीतले नेते सुधारले नाहीत. तृणमूळ काँग्रेसच्या आमदाराने राम मंदिराचा “अपवित्र” असे म्हणून अपमान केला.
बंगाल भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी रामेंदु सिन्हा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या अपमानास्पद वक्तव्याची मी फक्त निंदा करत नाही, तर जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहे, असे सुवेंदु अधिकारी यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर म्हटले आहे.
तृणमूळ काँग्रेसचे नेते असेच आहेत. हिंदूंवर आक्रमण करण्याची त्यांची हिंमत इतकी वाढली आहे की, आता ते भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराला अपवित्र ठरवत आहेत” अशा शब्दात सुवेंदु अधिकारी यांनी टीएमसीवर हल्लाबोल केला. तारकेश्वरचे आमदार रामेंदु सिन्हा रॉय यांनी भव्य राम मंदिराला अपवित्र ठरवलय. कुठल्याही भारतीय हिंदूने अशा अपवित्र स्थळाची पूजा करु नये, असं त्यांनी म्हटलय.
एफआयआर नोंदवणार
सुवेंदु अधिकारी म्हणाले की, मी त्यांच्या या अपमानास्पद वक्तव्याचा फक्त निषेधच करत नाही, तर जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवणार आहे. रामेंदु सिन्हा आरामबाग संघटनात्मक जिल्ह्याचे टीएमसी अध्यक्ष आहेत.
Arrogance of the INDI front; Insult of Sanatan Dharma by DMK, Insult of Ram Temple by Trinamool Congress leader!!
महत्वाच्या बातम्या
- भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा
- ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ
- हरियाणा पोलिसांना यश, इनेलोचे नेते नफे सिंह राठी खूनप्रकरणी गोव्यातून 2 शूटर्सना अटक
- लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली “संधी”; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK – INDI परिवारवादाची “दांडी”!!
- सनातन धर्माचा अपमान; सुप्रीम कोर्टाची उदयनिधी स्टालिनला सणसणीत चपराक!!