वृत्तसंस्था
मुंबई : बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद 5 सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएसने मुंबईत मोस्ट वॉन्टेड बंगाली दहशतवाद्याला अटक केली आहे. हा जिहादी दहशतवादी पश्चिम बंगाल एसटीएफला हवा हवा आहे. सद्दाम खान असे संशयिताचे नाव असून तो अनेक प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. मोस्ट वॉन्टेड जिहादी दहशतवाद्यांमध्ये तो सामील होता. arrested Samir Hossain Shaikh from Diamond Harbour PS area& Saddam Hossain Khan from Nirmalnagar Mumbai
दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांच्या एसटीए अधिकाऱ्यांनी आज सकाळी चंदनगर – देऊलपोटा येथील समीर हुसेन शेख (30) याला डायमंड हार्बर पीएस परिसरातून अटक केली, तर एसटीएफ पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने मुंबई एटीएस च्या मदतीने सद्दाम हुसेन खान (34) रा. अब्दुलपूर, पारुलिया कोस्टल पीएस, जिल्हा डायमंड हार्बर याला अटक केली. हा मुंबईतील निर्मल नगर मध्ये लपून राहिला होता. या दोन्ही जिहादी दहशतवाद्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याची सुनावणी उद्या होणार आहे.
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद या 5 सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत त्यांच्या द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयक वाटाघाटी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात कोणतेही दहशतवादी कृत्य घडू नये यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट वर आहेत. मुंबई आणि बंगाल मध्ये एकाच वेळी कारवाई करून दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
arrested Samir Hossain Shaikh from Diamond Harbour PS area& Saddam Hossain Khan from Nirmalnagar Mumbai
महत्वाच्या बातम्या
- मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षात बंड : जेडीयूचे 6 पैकी 5 आमदार भाजपमध्ये दाखल, एनडीए सोडण्याच्या निर्णयावर नाराज
- सुप्रीम कोर्टाकडून तिस्ता यांना तात्पुरता जामीन : गुजरात सरकारने जामिनाला केला होता विरोध, प्रतिज्ञापत्रही दाखल
- भाजप अध्यक्ष नड्डांनी दाखवला काँग्रेसला आरसा : म्हणाले- आधी पक्ष जोडा, नंतर ‘भारत जोडो’बद्दल बोला
- Nifty50 : आता अदानींची ही कंपनी निफ्टी50 मध्ये, श्री सिमेंट झाली बाहेर