• Download App
    मास्क नसल्यास अटक करून डांबण्याचा फिलिपिन्सच्या अध्यक्षांचा तुघलकी आदेश।Arrest people who are not wearing mask

    मास्क नसल्यास अटक करून डांबण्याचा फिलिपिन्सच्या अध्यक्षांचा तुघलकी आदेश

    वृत्तसंस्था

    मनिला : मास्क योग्य पद्धतीने न घालणाऱ्या व्यक्तींना अटक करा असा आदेश फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो ड्युटेर्टे यांनी पोलिसांना दिला आहे. त्यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. मात्र त्यावेळी ते सोडून इतर सर्वांनी मास्क घातला होता. त्यावरून आता देशभऱ चर्चेचा उधाण आले आहे. Arrest people who are not wearing mask

    ड्युटेर्टे यांचे प्रवक्ते हॅरी रोक्यू यांनी असा आदेश जारी करण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार दोषी व्यक्तीवर कोणताही आरोप न ठेवता त्याला १२ तास डांबून ठेवले जाईल.



    गेल्या वर्षी लॉकडाउन मोडणाऱ्यास आणि समस्या निर्माण करणाऱ्यास गोळ्या घालाव्यात असा आदेश ड्युटेर्टे यांनी दिला होता. त्यावेळी मानवी हक्क संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती.

    यावेळी बेठकीनंतर ड्युटेर्टे म्हणाले कोरोना निर्बंध मोडणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर बनावे. नाकाखाली मास्क असल्यास त्याला अटक करावी. तो मास्क नीट का घालत नाही याची चौकशी करावी. हे माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी आहे. तुम्हाला संसर्ग होऊ नये आणि तुमच्यामुळे संसर्ग होऊ नये हे देशाच्या हिताचे आहे.

    Arrest people who are not wearing mask

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा