भाटा धुरियन परिसरात महामार्गावर ही घटना घडली
विशेष प्रतिनिधी
Army Truck Fire: पूंछ-जम्मू महामार्गावर लष्कराच्या वाहनाला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. पीआरओ डिफेन्स जम्मू यांनी सांगितले की, पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या ट्रकला लागलेल्या आगीत पाच लष्करी जवानांचा मृत्यू झाला. भाटा धुरियन परिसरात महामार्गावर ही घटना घडली. वीज पडल्याने हा अपघात झाल्याचे लष्कराच्या सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितले आहे. Army vehicle catches fire on Poonch Jammu highway five jawans die
सध्या लष्कराने यात दहशतवाद्यांचा हात असल्याचा इन्कार केला आहे. या घटनेच्या तपासासाठी पथक पाठवण्यात आले असून लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोलचे आहेत. ही घटना घडलेल्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडत आहे. लष्कराचे वाहन भीमबेर गली येथून पूंछच्या संगीओतकडे जात असताना ही घटना घडली.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुंछ जिल्ह्यातील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेने दु:ख झाल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
सिक्कीममध्येही झाला होता अपघात
याआधी सिक्कीममध्ये आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी एक अपघात झाला होता. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने उत्तर सिक्कीममधील डोंगराळ भागातून रस्ता अपघातात जखमी झालेल्या १३ लष्करी जवानांची सुटका केली होती.
Army vehicle catches fire on Poonch Jammu highway five jawans die
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण