संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्यात रशिया आणि भारत या दोन्ही देशांनी या कराराला तत्त्वतः मान्यता दिली होती. उत्तर प्रदेश भारताचे संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे अमेठी जिल्ह्याने कोरवा येथील उत्पादन युनिटमधून पाच लाख AK-203 असॉल्ट रायफल तयार केल्यामुळे, उत्तर प्रदेशातील संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. पुढच्या महिन्यात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भेटीदरम्यान AK-203 च्या बहुप्रतिक्षित करारावर स्वाक्षरी होऊ शकते. मंगळवारी होणाऱ्या संरक्षण खरेदी परिषदेच्या विशेष बैठकीत यावर चर्चा होणार आहे. Army to get AK-203 assault rifles manufactured in UP’s Amethi soon
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्लीः मोदी सरकारने उत्तर प्रदेशातील अमेठीतल्या कोरवा येथे ५००० कोटींच्या पाच लाख AK-203 असॉल्ट रायफल्सच्या निर्मिती करण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सोमवारी दिल्लीत होणाऱ्या शिखर परिषदेत या मोठ्या कराराची औपचारिक घोषणा करण्यात ेयणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ५ डिसेंबरला प्रस्तावित भारत दौऱ्यापूर्वी मंगळवारी संरक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक होत आहे. यामध्ये AK-203 असॉल्ट रायफलच्या कराराला अंतिम रूप देण्याचा विचार केला जाईल. या करारामध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी येथे ७.५ लाख एके-203 रायफल तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल (DAC) चा हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने बुधवारी हा करार मंजूर केला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. काही दिवसांपूर्वी डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल (DAC) ने याला हिरवा झेंडा दाखवला होता. “भारतातील संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाला चालना देण्याच्या प्रयत्नात सरकारने अमेठीतील कोरवा येथे पाच लाखांहून अधिक एके-203 असॉल्ट रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली.
पुढच्या महिन्यात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भेटीदरम्यान AK-203 च्या बहुप्रतिक्षित करारावर स्वाक्षरी होऊ शकते. मंगळवारी होणाऱ्या संरक्षण खरेदी परिषदेच्या विशेष बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
Army to get AK-203 assault rifles manufactured in UP’s Amethi soon
महत्त्वाच्या बातम्या
- खामगावमध्ये ऑपरेशन वाघ; जमावबंदी, संचारबंदी लागू, नागरी वस्तीत वन विभागाची शोध मोहीम
- भिवंडी : गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला लागली भीषण आग ; अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल
- राजकारण हे भौतिकशास्त्र नाही, ते रसायनशास्त्र, युतीच्या मतांची बेरीज-वजाबाकी होत नाही, अमित शहा यांचा दावा
- सामनाच्या संपादकांचे नेते आता सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी, देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांवर निशाणा
- मुख्यमंत्री महिला आमदाराला म्हणाले तुम्ही सुंदर दिसता, आमदारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे केली तक्रार
- कलम ३७० लागू करण्यापूर्वी काश्मीरमध्ये शांतता होती का? अमित शहा यांचा सवाल