• Download App
    सीमेवरील जवानांच्या हातात मेक इन इंडियाच्या Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles; घुसखोरांवर जबरदस्त प्रहार army soldiers have been equipped with latest weapons incl Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles to take on counter-infiltration

    सीमेवरील जवानांच्या हातात मेक इन इंडियाच्या Sig Sauer assault rifles and Galil sniper rifles; घुसखोरांवर जबरदस्त प्रहार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – भारतीय लष्काराने बदल छोटा – परिणाम मोठा हे ब्रीद साधत सीमेवरील जवानांच्या हातात मेक इन इंडिया संकल्पनेतील Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles दिल्या आहेत. यामुळे सीमेवर भारतीय लष्कराची प्रहारक्षमता अधिक अचूक आणि परिणामकारक झाली आहे. army soldiers have been equipped with latest weapons incl Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles to take on counter-infiltration

    रशियन बनावटीच्या जुन्या एके प्रकारातील रायफल्स आता बदली करण्यात आल्या आहेत. Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles मध्ये तंत्रज्ञान इस्त्रायली आहे. पण त्यांचे उत्पादन भारतात होत आहे. भारतीय लष्कराने मध्य प्रदेशातील फॅक्टरीत ७२००० रायफल्सच्या उत्पादनाची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी काही ऑर्डर पूर्ण झाली असून या रायफल्स आता सीमेवरील जवानांच्या हातात देण्यात आल्या आहेत.

    अचूकता आणि प्रहारक्षमतेच्या बाबतीत Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles या दोन्ही जगात सर्वोकृष्ट मानल्या जातात. वॉर फ्रंटवर या सर्वाधिक उपयोगी ठरल्याचा अनुभव भारतीय लष्कराने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये घेतला आहे. त्याच बरोबर सीमेवरील जवानांच्या हातात Pika machine guns देण्यात आल्याने भारतीय लष्कराच्या प्रहारक्षमतेत मोठी भर पडली आहे. सीमेवरील गस्ती पथकांसाठी ही हत्यारे एक वरदान सिध्द होतील, असा विश्वास लष्कराच्या प्रवक्त्याने व्यक्त केला आहे.

    घुसखोर जास्तीत जास्त चायना मेड हत्यारे वापरतात. त्यांची प्रहारक्षमता ठीक आहे. पण त्यांच्यात अचूकता नाही. ती बेछूट फायरिंगसाठी ते वापरतात. पण भारतीय लष्कर त्यांना प्रत्युत्तर देताना आता अचूक आणि अधिक परिणामकारक प्रहार करू शकेल, असे लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

    army soldiers have been equipped with latest weapons incl Sig Sauer assault rifles & Galil sniper rifles to take on counter-infiltration

    Related posts

    Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!

    Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    Icon News Hub