• Download App
    हवाई दलाच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी लष्कराने जारी केले दहशतवाद्यांचे रेखाचित्र Army releases sketch of terrorists in connection with attack on Air Force convoy

    हवाई दलाच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी लष्कराने जारी केले दहशतवाद्यांचे रेखाचित्र

    जो कोणी त्यांचा पत्ता सांगेल त्याला 20 लाखांचे बक्षीस

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर हाय अलर्टवर आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याच्या ठावठिकाणाबाबत माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या दोन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. Army releases sketch of terrorists in connection with attack on Air Force convoy

    सुरक्षा दलाचे पथक दहशतवाद्यांना पकडण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. यासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली आहे. शनिवारी (४ मे) संध्याकाळी पूंछ जिल्ह्यातील शाहसीतारजवळ दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचा जवान विकी पहाडे जखमी झाले आणि नंतर उपचारादरम्यान ते शहीद झाले. या हल्ल्यात त्यांच्याशिवाय अन्य चार जवानही जखमी झाले आहेत.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शाहसीतार भागात सशस्त्र दलाचे जवान ही कारवाई करत आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी सशस्त्र बुलेटप्रूफ वाहने आणि श्वान पथके तयार केली आहेत. रविवारी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

    अतिरिक्त महासंचालकांच्या म्हणण्यानुसार, 16 कॉर्प्स कमांडर आणि जम्मू झोनचे एडीजी आनंद जैन यांनी जीओसी रोमियो फोर्स, आयजीपी सीआरपीएफ आणि डीआयजी आरपी रेंजसह परिसराला भेट दिली. त्यांनी शोध मोहिमेचे निरीक्षण केले. हल्ल्यानंतर अनेक संशयितांना चौकशीसाठी पकडण्यात आले आहे.

    दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाची ओळख विकी पहाडे अशी समोर आली आहे. बहिणीच्या लग्नानंतर ते १५ दिवसांपूर्वीच ड्युटीवर परतले होता, असे सांगितले जात आहे. ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होते. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील नोनिया करबल भागात त्यांचे कुटुंब राहते. त्यांच्या पश्चात पत्नी रीना आणि मुलगा हार्दिक असा परिवार आहे. 2011 मध्ये ते भारतीय हवाई दलात दाखल झाले होते.

    Army releases sketch of terrorists in connection with attack on Air Force convoy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!