वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या जेवणाच्या थाळीत तब्बल 50 वर्षांनंतर मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिलपासून सर्व युनिट्समधील सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या आहारात मिलेट्स 25% असतील. लष्कराच्या आदेशानुसार बाजरी, ज्वारी आणि नाचणीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. चांगले परिणाम आल्यास इतर धान्यांचा समावेश केला जाईल.Army diet will change after 50 years, soldiers will get coarse grains, system will be applied in paramilitary force after army
सध्या, प्लेटमध्ये 75% पारंपरिक धान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ असतील. सैन्यातील सर्व समारोह, मोठी पंगत आणि कॅन्टीनमध्ये भरड धान्य वापरावे लागेल. कँटोन्मेंटमध्ये बांधण्यात आलेल्या कॅन्टीनमध्ये स्वतंत्र काउंटर उभारण्यात येणार आहे. लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमिताभ शर्मा म्हणाले की, सैनिक आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या घरातही मिलेट्स वापरण्यास प्रवृत्त केले जाईल. लष्करानंतर ही प्रणाली निमलष्करी दलातही लागू होणार आहे.
आर्मीच्या स्वयंपाकींना मिलेट्स स्नॅक्सचे प्रशिक्षण
सैनिक आणि अधिकारी यांना भरड धान्य आवडीने खाता यावेत यासाठी लष्करातील स्वयंपाकींनाही विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणात ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून नाश्ता, जेवण आणि मिठाई काय बनवता येईल हे स्वयंपाकींना सांगण्यात येत आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की 1972 पूर्वी सैन्यात फक्त भरड धान्यच दिले जात होते. त्यानंतर गहू व तांदळाचा पुरवठा सुरू झाला.
UN ने 2023 हे वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले
संयुक्त राष्ट्रांनी (UN) 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले आहे. हे भारताने प्रस्तावित केले होते. 72 देशांनी त्याला पाठिंबा दिला आहे. पुढाकार घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 डिसेंबर 2022 रोजी संसदेत इतर खासदारांसह भरड धान्यापासून बनवलेले अन्न खाल्ले होते. भारताने या आर्थिक वर्षात एप्रिल ते 22 नोव्हेंबर या कालावधीत सुमारे 1.04 लाख मेट्रिक टन भरडधान्याची निर्यात केली आहे.
बाजरी, ज्वारी किंवा नाचणी हे गव्हापेक्षा जास्त पौष्टिक असतात. त्यात भरपूर खनिजे असतात. यामुळे पचनसंस्था आणि स्नायू मजबूत होतात. रोजच्या वापराने साखर नियंत्रणात राहते.
Army diet will change after 50 years, soldiers will get coarse grains, system will be applied in paramilitary force after army
महत्वाच्या बातम्या
- खलिस्तानी समर्थकांची सरकारला धमकी, प्रगती मैदानात लावणार झेंडा, अमेरिकेतील भारतीय दूतावासावर निदर्शने; पत्रकाराला मारहाण
- राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईलमध्ये लिहिले ‘अपात्र खासदार’; प्रियांकांचा राजघाटावरून हल्लाबोल
- “एकतर इम्रान खान यांची हत्या होईल किंवा…” पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांचे खळबळजनक विधान!
- 8 वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू, दलाई लामा यांनी पूर्ण केले धार्मिक विधी