वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये 21 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख मनोज पांडे सोमवारी (25 डिसेंबर) पूंछला पोहोचले. लष्करप्रमुखांनी येथील कमांडर्सची भेट घेऊन त्यांना व्यावसायिक पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.Army action in the death of 3 citizens of Poonch; Court of inquiry started against 4 persons including brigadier rank officer
लष्करप्रमुखांच्या दौऱ्यापूर्वीच लष्कराने आरोपी सैनिकांविरुद्ध कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू केली आहे. लष्कराने सुरनकोट बेल्टचे प्रभारी ब्रिगेडियर स्तरावरील अधिकारी आणि 48 राष्ट्रीय रायफल्सच्या 3 सैनिकांना त्यांच्या सध्याच्या कर्तव्यावरून हटवले आहे.
दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. सुरनकोट भागातील ढेरा की गली आणि बाफलियाजमध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी अमेरिकन एम-4 कार्बाइन असॉल्ट रायफलमधून गोळ्या झाडल्या होत्या.
जवान शहीद झाल्यानंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम राबवली. चौकशीसाठी नेण्यात आलेल्या 8 संशयितांपैकी 3 जणांचे मृतदेह 22 डिसेंबर रोजी सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
21 डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर हल्ल्याच्या ठिकाणाची छायाचित्रेही जारी केली, ज्यामध्ये एम-4 रायफल वापरल्याचा दावा करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम-4 रायफल्स पाकिस्तानी हँडलर्सकडून दहशतवाद्यांकडे आल्या होत्या. ही रायफल अफगाणिस्तान सोडताना अमेरिकन सैन्याने मागे सोडलेल्या शस्त्रागाराचा भाग आहे.
सुरक्षा दलांनी चौकशीसाठी ज्या तीन जणांना उचललं होतं, त्यांचे मृतदेह सापडले आहेत. सफीर अहमद, मोहम्मद शौकत आणि शब्बीर अहमद ही मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मारहाणीत झालेल्या जखमांमुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. चौकशीदरम्यान जवानांनी या लोकांशी कठोरपणा दाखवला होता. ज्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. यानंतर लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेतले.
लष्कराचे काउंटर इनसर्जन्सी युनिट वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये, एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता आणि थानमंडीजवळील ब्लू पोस्ट कॅम्पमध्ये ग्रेनेडचा स्फोट केला होता, ज्यात तीन अधिकाऱ्यांसह पाच कर्मचारी जखमी झाले होते.
Army action in the death of 3 citizens of Poonch; Court of inquiry started against 4 persons including brigadier rank officer
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्याने काय बोलावं हेच कळत नाही; राम मंदिराच्या टीकेवरून नारायण राणेंनी घेतला समाचार
- आता लोकसभा निवडणुका झाल्या तर सरकार कोणाचे येणार? सर्वेक्षणात इंडिया-एनडीएला किती जागा? पाहा आकडेवारी
- पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा??, हे ठरवा, नाहीतर तेच बोकांडी बसतील; प्रकाश आंबेडकरांचा मविआच्या नेत्यांना इशारा!!
- पंडित धीरेंद्र शास्त्री लवकरच लग्न करणार; लग्नासाठी येत आहेत भावनिक पत्रे, राम मंदिरावरही केले वक्तव्य