• Download App
    ARJUN AWARDS: अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवनची 'गब्बर' पोस्ट ; म्हणाला मी वचन देतो की ..... । ARJUNA AWARDS: Team indias star opener gabbar shikhar dhawan shared his emotion after recived arjuna award

    ARJUN AWARDS: अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवनची ‘गब्बर’ पोस्ट ; म्हणाला मी वचन देतो की …..

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 12 खेळाडूंना खेलरत्न तर 35 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शिखर धवन आहेत देखील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .टीम इंडियाचा सलामवीर शिखर धवनने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत एक वचनही दिले आहे. ARJUNA AWARDS: Team indias star opener gabbar shikhar dhawan shared his emotion after recived arjuna award

    अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर गब्बरने फेसबूकवर पोस्ट लिहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    शिखर फेसबूक पोस्टध्ये काय म्हणाला?

    “मला अर्जुन पुरस्कार मिळाला, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.  मी त्या सर्वांचे आभार मानतो, जे माझ्या इथवरच्या प्रवासात माझ्यासोबत होते. माझे प्रशिक्षक, डॉक्टर,  सपोर्ट स्टाफ, बीसीसीआय, संघातील सहकारी, सर्व चाहते, माझे मित्र आणि कुटुंबियांचा उल्लेख शिखरने केला आहे. तुमची सोबत आणि प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं.  तुमच्या कठोर परिश्रमाची दखल घेतली जाणं, हा माझ्यासाठी अविश्विसनीय क्षण आहे.  मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.  देशाच्या नाव उज्वल करण्यासाठी मी कठोर मेहनत करेन. सर्व पुरस्कार विजेत्याचं अभिनंदन”, अशा शब्दात शिखरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.



    इतर खेळाडूंचाही गौरव

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहिया, टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन, अनुभवी गोलकीपर श्रीजेश पीआर, याशिवाय अवनी लेखरा, सुमित अंतील, प्रमोद भगत, मनीष नरवाल, मिताली राज आणि भारतीय हॉकी टीमचे कर्णधार सुनील क्षीरसागर यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.

    ARJUNA AWARDS : Team indias star opener gabbar shikhar dhawan shared his emotion after recived arjuna award

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड