केंद्रीयमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली यदुवंशी परिषदेचे झाले आयोजन, तर लालू भडकले
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये यदुवंशियांबाबत भाजप-आरजेडीमध्ये तुफान युद्ध सुरू झाले आहे. गोवर्धन पूजेच्या निमित्ताने भाजपने राजधानी पाटणा येथे यदुवंशी परिषदेचे आयोजन केले होते. Argument between BJP RJD regarding Yaduvanshi in Bihar
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नित्यानंद राय होते. या परिषदेत मोठ्या संख्येने यादव भाजपमध्ये दाखल झाल्याचा दावा केला जात आहे. यादवांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेल्या या परिषदेवर आरजेडीने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
नित्यानंद यांनी यदुवंशी परिषदेला संबोधित करताना लालू कुटुंबावर घणाघाती हल्ला चढवला होता. लालूंवर यादवांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता आणि लालू यादव फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतात, असे म्हटले होते. भाजपच्या आरोपांनी राजदला धक्का बसला असून, लालू यादव यांनी भाजपवर प्रहार करत यदुवंशीयांमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला.
नित्यानंद राय यांच्या वक्तव्याला विरोध करताना आरजेडी प्रमुख लालू यादव म्हणाले, “जिथे भाजपची सत्ता आहे, तेथे यदुवंशीयांमध्ये फूट पाडली जात आहे. भगवान कृष्णाने ज्याप्रमाणे दुर्बल लोकांचे आणि सजीवांचे रक्षण केले, त्याचप्रमाणे आमच्या सरकारमध्ये ७५ टक्के आरक्षण दिले जात आहे.
Argument between BJP RJD regarding Yaduvanshi in Bihar
महत्वाच्या बातम्या
- “काँग्रेसने आदिवासींची कधीच पर्वा केली नाही, तर भाजप…” ; मोदींचं विधान!
- मतस्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवादाला चिथावणी देऊ नका; कॅनडियन पंतप्रधानांना भारताने सुनावले!!
- गोविंद बागेतली दिवाळी पूर्वार्धात न आलेल्या अजितदादांभोवती फिरली; उत्तरार्धात शरद पवारांच्या जातीच्या चर्चेभोवती फिरली!!
- 33 % महिला आरक्षण ताबडतोब लागू करण्याची मागणी करण्यात काँग्रेस पुढे, पण प्रत्यक्ष उमेदवारी देण्यात मागे!!