विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासुबाई बनल्या भारतीय राज्यसभेच्या खासदार, राष्ट्रपतींनी केली सुधा मूर्तींची नियुक्ती!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. Appointment of Sudha Murthy by the President Rajyasabha
इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासूबाई एवढीच सुधा मूर्तींची ओळख नसून त्या स्वतः उद्योजिका, लेखिका, समाजसेविका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस फाउंडेशन द्वारे त्या संपूर्ण जगभर शैक्षणिक कार्य करत आहेत. मूर्ती दाम्पत्याची कन्या अक्षता तिचे पती ऋषी सूनक सध्या इंग्लंडच्या पंतप्रधानपदी आहेत.
सुधा मूर्तींचे सामाजिक, उद्योग आणि साहित्यिक क्षेत्रातले काम लक्षात घेऊन राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. या संदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडल वर दिली.
ती अशी :
@narendramodi भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकन केल्याने मला आनंद होत आहे @SmtSudhaMurty राज्यसभेत जी. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेत त्यांची उपस्थिती ही आमच्या नारी शक्तीचा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि सामर्थ्याचे उदाहरण देते. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा!!
Appointment of Sudha Murthy by the President Rajyasabha
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली भेट, महागाई भत्ता वाढवला!
- पवारांच्या तोंडी आमदाराला दमबाजीची भाषा; कलमाडींवर केलेला “तुपे पाटील” प्रयोग शेळकेंवर यशस्वी होण्याची अपेक्षा!!
- नरसिंह रावांच्या संकटमोचकाची कन्या भाजपमध्ये; पद्मजा करुणाकरण – वेणुगोपाल यांचा पक्षप्रवेश!!
- Delhi Liquor Policy: संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; कोर्टाने पुन्हा वाढवली कोठडी
- मुंबईत ‘आरोग्य आपल्या दारी’ मोहीम