• Download App
    ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर नियुक्ती|Appointment of senior lawyer Mahesh Jethmalani to Rajya Sabha

    ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर नियुक्ती

    माजी मंत्री राम जेठमलानी यांचे पुत्र ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे ही संधी देण्यात आली आहे.Appointment of senior lawyer Mahesh Jethmalani to Rajya Sabha


    नवी दिल्ली : माजी मंत्री राम जेठमलानी यांचे पुत्र ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे ही संधी देण्यात आली आहे.

    नामनिर्देशित गटातील दोन जागा रिक्त झाल्यानंतर जेठमलानी यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे.महेश जेठमलानी यांचे वडील राम जेठमलानी हे प्रख्यात वकील होते. त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले होते.



    त्याचबरोबर कायदा मंत्रीपदही सांभाळले होते. महेश जेठमलानी . क्रिमिनल लॉ या विषयात वकिली करत असून सध्या परमबीर सिंग आणि राज्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या न्यायालयीन लढ्यात महेश जेठमलानी त्यांचे वकील म्हणून खटल्यात बाजू मांडत आहेत.

    महेश जेठमलानी हे देशातील सर्वात महाग वकीलांपैकी एक मानले जातात. २००९ साली त्यांनी प्रिय दत्त यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. जेठमलानी यांनी सेंट झेवियर कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स डिग्री मिळविली.

    जेठमलानी यांचे सहकारी प्रणव बधेका यांच्या मते महेश जेठमलानी यांना ही उमेदवारी मिळाल्यामुळे राज्यसभेत कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या एका व्यक्तीचा राज्यसभेत प्रवेश होईल. त्यांच्या या ज्ञानाचा संसदेला नक्कीच उपयोग होऊ शकतो.

    मार्च महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वपन दासगुप्ता यांना उमेदवारी दिल्यानंतर दासगुप्ता यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. रघुनाथ मोहपात्रा हे करोनामुळे गेल्या महिन्यात मृत्युमुखी पडले होते.

    त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांसाठी नियुक्ती करायची आहे. केंद्राच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यसभेवर १२ सदस्यांची नेमणूक करू शकतात. यामध्ये साहित्य, विज्ञान, क्रीडा, कला, आणि सामाजिक सेवा यासारख्या क्षेत्रातून नावाजलेल्या व्यक्ती असतात.

    Appointment of senior lawyer Mahesh Jethmalani to Rajya Sabha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले