• Download App
    नवे सीडीएस नेमण्याच्या केंद्रीय पातळीवर वेगवान हालचाली; लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर!!। Appointment of new CDS soon as per recommendations of high power committee of three services

    नवे सीडीएस नेमण्याच्या केंद्रीय पातळीवर वेगवान हालचाली; लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताच्या सैन्य दलांचे प्रमुख अर्थात नवे सीडीएस नेमण्याच्या आता वेगवान हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील निधनानंतर फार काळ सीडीएस हे सैन्य दलाचे सर्वोच्च पद रिक्त ठेवता येणार नाही. त्यामुळेच या पदावर सैन्य दलातील वरिष्ठ व्यक्तीला नेण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. Appointment of new CDS soon as per recommendations of high power committee of three services

    त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. तिन्ही सैन्य दलांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती सरकारने नेमेल. तीन दिवसांमध्ये ही समिती नव्या सीडीएसचे नाव असलेली शिफारस संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे करेल. राजनाथ सिंग हे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेअर्स अर्थात पंतप्रधानांच्या नेतृत्वतील सर्वोच्च समिती यापुढे या नावाची शिफारस ठेवतील आणि केंद्र सरकार नवीन सीडीएसची घोषणा करू शकेल.



    लष्करातील सध्याची व्यवस्था पाहतात लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंड नरवणे हे सर्वात वरिष्ठ आणि ज्येष्ठ अधिकारी आहेत. एप्रिल 2022 मध्ये ते निवृत्त होत आहेत. त्याआधी त्यांची सीडीएस पदावर नियुक्ती झाली तर ते उचित ठरेल, असे मत सैन्य दलाच्या अनेक माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जनरल नरवणे यांची नियुक्ती जर सीडीएस पदावर झाली तर लगेच नवे लष्करप्रमुख सरकारला नेमावे लागतील. लष्कराच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम कमांडच्या प्रमुख पदावरील एक अधिकारी नवे लष्करप्रमुख होऊ शकतील.

    अर्थात हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारवर अवलंबून आहे. केंद्र सरकार कोणता धोरणात्मक निर्णय घेते यावर नवीन सीडीएस पदाची नियुक्ती ठरू शकेल. परंतु, या प्रक्रियेला लवकर पूर्ण करावे लागेल. कारण सीडीएस हे पद फार काळ रिक्त ठेवता येणार नाही, असे मतही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

    Appointment of new CDS soon as per recommendations of high power committee of three services

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये