• Download App
    लग्नात आहेर नको, मोदींना मते द्या; लग्न पत्रिका व्हायरल Appeal To Vote Prime Minister Narendra Modi From The Marriage Card Marathi News

    लग्नात आहेर नको, मोदींना मते द्या; लग्न पत्रिका व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीची धुळवड सुरू असताना परीक्षेचा हंगाम आणि लग्नसराईचे दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते विविध पद्धतीने त्यांचा प्रचार करत आहेत. तेलंगणा आणि मध्य प्रदेशात लग्नपत्रिकेतून अनोखी मागणी करण्यात आली आहे. लग्नात आहेर आणू नका, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करा. 2019 निवडणुकी मोदी लहर होती. पण 2024 मध्ये सुनामी आली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे, असा मेसेज लग्नपत्रिकेत लिहिला आहे. Appeal To Vote Prime Minister Narendra Modi From The Marriage Card Marathi News

    तेलंगणात लग्नपत्रिकेतून आवाहन

    तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. नंदिकंती नरसिमलू आणि त्यांची पत्नी नंदिकंती निर्मला यांचा मुलगा साई कुमार यांचे 4 एप्रिल रोजी लग्न आहे. साई कुमारचे लग्न महिमा रानी हिच्याशी होत आहे. लाकडपासून तयार झालेल्या वस्तूंचा व्यवसाय करणारे नरसिमलू यांनी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे. त्या लग्नपत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की नरेंद्र मोदी यांना मतदान करणे हेच आमच्यासाठी महत्वाचे गिफ्ट आहे. नरसिमलू यांच्या दोन मुलींचे यापूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी त्यांनी काही अपील केली नाही.

    वराचे पिता नरसिमलू यांनी सांगितले की, माझी कल्पना कुटुंबात मांडली तेव्हा सर्वांना खूप आवडली. घरातील सर्व जण म्हणाले की होय असे केले पाहिजे. त्यानंतर मी निमंत्रण पत्रिका वाटण्यास सुरुवात केली आहे. ही लग्नपत्रिका पाहून लोक काही क्षण आश्चर्यचकित होत होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही या लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे. याबाबत इंटरनेट युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

    उज्जैनमधून अशी केली होती अपील

    तेलंगणाप्रमाणे उज्जैनमधील दौलतगंज येथील व्यवसायीक बाबूलाल रघुवंशी आणि जितेंद्र रघुवंशी यांच्या घरात लग्न आहे. बाबूलाल रघुवंशी यांचा मुलगा अश्विन याचे लग्न मार्च महिन्यात झाले आहे. त्यांनी लग्नपत्रिकेत म्हटले होते की, मागील वेळ मोदी लहर होती. परंतु आता सुनामी झाली पाहिजे. २०२४ मध्ये मोदी यांना पंतप्रधान बनवा, असे आवाहन त्यांनी लग्नपत्रिकेत केले होते.

    Appeal To Vote Prime Minister Narendra Modi From The Marriage Card Marathi News

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या