विशेष प्रतिनिधी
भोपाळ : बेजबाबदार वक्तव्ये करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांवर आता भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व ऑनलाईन नजर ठेवणार आहे. त्यासाठी खास अॅप विकसित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशात याची सुरूवात करण्यात येणार असून त्यामुळे या नेत्यांवर जरब राहणार आहे. App will keep an eye on BJP leaders’ irresponsible statements, get real time information using technology
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. माध्यमांकडून याच आक्षेपार्ह वक्तव्यांना प्रसिध्दी मिळते आणि त्यामुळे पक्षाचे चांगले काम झाकोळले जाते. त्यामुळे मध्य प्रदेशात खास अॅप विकसित करण्यात आले. एखाद्या नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर या अॅपद्वारे तातडीने माहिती मिळणार आहे. अनेकदा हे नेते आपल्या वक्तव्याचा विपर्याास केल्याचेही सांगतात. या अॅपमुळे त्यांना असे म्हणता येणार नाही.
त्याचबरोबर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्यास तातडीने त्याबाबत खुलासाही करता येणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे.
पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य स्तरावर ही समिती स्थापन केल्यामुळे बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर वचक राहणार आहे.
त्याचबरोबर जबाबदारी निश्चित करता येणार आहे. अनेकदा बड्या नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर त्याची माहिती मिळते. मात्र, कधी कधी स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेही चुकीचे बोलतात. त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. या अॅपमुळे राज्य पातळीवर अशा प्रकारच्या वक्तव्यांची माहिती मिळणे शक्य होणार आहे. आपल्यावर लक्ष आहे हे माहित झाल्यावर या नेत्याकंडूनही जबाबदारीचे पालन होईल. स्थानिक वादातून पक्षविरोधी शेरेबाजी करणाऱ्यांनाही त्यामुळे आळा बसेल.
पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठीही आता यंत्रणा तयार केली जाणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. काम करणाऱ्यांना त्यामुळे प्रोत्साहन मिळेल. अनेकदा कार्यकर्ते म्हणतात की त्यांना योग्य जबाबदारी देण्यात आली नाही. या नव्या यंत्रणेमुळे त्यांची नाराजी कमी होणार आहे.
App will keep an eye on BJP leaders’ irresponsible statements, get real time information using technology
महत्त्वाच्या बातम्या
- President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना संबोधन; कोरोना, कृषी, नवे संसद भवन, जम्मू-कश्मीरसह या मुद्द्यांचा उल्लेख
- World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण
- सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही
- वीर जवान तुझे सलाम : कॅप्टन आशुतोष आणि मेजर अरुण कुमार पांडे यांना शौर्य चक्र, काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांचा केला होता खात्मा