वृत्तसंस्था
पथानामथिट्टा : देशात लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये कुटुंबामध्ये आपापसातच लढत आहे. वडील एकीकडे मुलगा दुसरीकडे, पती एकीकडे पत्नी दुसकीकडे असे अनेक मतदारसंघात घडले आहे. केरळच्या पथानामथिट्टा लोकसभा मतदारसंघातील हेच चित्र दिसत असून तेथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री, केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. तेथे अनिल अँटनीचा पराभव होईल, अशी “शापवाणी” ए. के. अँटनी यांनी उच्चारली आहे. antony says his son and bjp candidate anil contesting in pathnamthitta loksabha seat
केरळ मध्ये खरी लढत कम्युनिस्ट पार्टी प्रणित एलडीएफ आणि काँग्रेस प्रणित युडीएफ यांच्यातच आहे. त्यामध्ये भाजप कुठेच नाही. त्यामुळे अनिल भाजपमध्ये गेला असला तरी त्याचा पराभव अटळ आहे, असे उद्गार ए. के. अँटनी यांनी काढले. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस मधून झाली. काँग्रेस हाच माझा धर्म आहे. त्यामुळे मी बाकी कोणाचा प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर केलेले आरोप सध्या कोणीच गांभीर्याने घेत नाही, कारण ते स्वतःच एक अपयशी मुख्यमंत्री आहेत, असा टोमणा ए. के. अँटनी यांनी हाणला.
राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान प्रचंड प्रवास करून ठिकठिकाणी माणसे जोडली. भारतातल्या जनतेने राहुल गांधींना प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे मोदी सरकारचा पराभव होणे अटळ आहे. केंद्रात सरकार स्थापनेचा स्थापनेची काँग्रेसला चांगली संधी आहे, असा दावाही ए. के. अँटनी यांनी केला.
अनिल अँटनी गेल्याच वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले. सध्या ते भाजपचे प्रवक्ते असून केरळमध्ये पक्षाने कात टाकताना ज्या अनेक तरुणांना आपल्याबरोबर जोडून घेतले, त्यापैकी अनिल अँटनी हे एक नेते आहेत. भाजपने त्यांना पथानामथिट्टा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊन तिथली लढत हाय प्रोफाईल केली आहे. पण आपल्याच वडिलांच्या “शापवाणी”चा अनिल अँटनींना सामना करावा लागत आहे. तो सामना ते कसा करतात??, यावर अनिल अँटनींचे भाजप मधले भवितव्य अवलंबून आहे.
antony says his son and bjp candidate anil contesting in pathnamthitta loksabha seat
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेत्यांशी संबंधित संघटना RSSच्या नावाचा करत आहे गैरवापर – भाजपचा आरोप!
- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई; इनाम असलेल्या तिघांसह १२ नक्षलवाद्यांना अटक!
- भाजपने केली मोठी मागणी! बंगालमध्ये निवडणुकीनंतरही केंद्रीय सुरक्षा दल तैनात ठेवावे
- उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तिकर “सेफ गेम”साठी मैदानात; पण ईडीच्या नोटीशी पुढे मुलगा टिकेल का निवडणुकीत??