विशेष प्रतिनिधी
जम्मू : श्रीनगरच्या जुन्या शहरातील नोहट्टा भागातील ऐतिहासिक जामिया मशिदीत रमजान महिन्यातील पहिल्या शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली. यामध्ये लहान मुले, वृद्ध, तरुण, महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी नमाज पठणानंतर मशिदीच्या मुख्य सभागृहातून देशविरोधी घोषणांचा आवाज गुंजला. Anti-national slogans from Srinagar mosque
त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लोक घोषणाबाजी करताना दिसत आहेत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. आरोपींचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मिरवाईज उमर फारुख याला नजरकैदेत ठेवणे हे यामागचे कारण आहे. कलम ३७० रद्द होण्यापूर्वी ५ऑगस्ट २०१९ रोजी मीरवाइझ नजरकैदेत आहे. औकाफसोबतच रमजानच्या या पवित्र महिन्यात त्याची सुटका करावी, अशी मागणीही लोक करत आहेत.
४ मार्च रोजी, सुमारे ३० आठवड्यांनंतर, लोकांना या मशिदीत सामूहिक शुक्रवारची नमाज अदा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. शुक्रवारच्या प्रार्थनेपूर्वी प्रवचन इमाम है सय्यद अहमद नक्शबंदी यांनी केले.
Anti-national slogans from Srinagar mosque
महत्त्वाच्या बातम्या
- आत्महत्या करण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार
- शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्याचे अमिषाने चार काेटींची फसवणुक
- गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 14 दिवसांची पोलीस कोठडी; किल्ला कोर्टाने दिली 2 दिवसांची पोलिस कोठडी!!
- सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येते – अजित पवार