• Download App
    YouTuber आणखी एका यूट्यूबरची हेरगिरी, पंजाबमधील

    YouTuber : आणखी एका यूट्यूबरची हेरगिरी, पंजाबमधील ११ लाख सब्स्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबरला अटक

    YouTuber

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर:YouTuber  पाकिस्तानने मोठ्या संख्येने सब्स्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबरना हेरगिरीसाठी वापरले असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.पंजाब पोलिसांनी एक मोठं हेरगिरीचे जाळे (espionage network) उघडकीस आणले असून, या जाळ्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट झालं आहे.YouTuber

    “जान महल” नावाचं यूट्यूब चॅनल चालवणारा जसबीर सिंह याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. जसबीर सिंह 1.1 मिलियन सब्स्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल चालवलं जात होतं. मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSOC) ने त्याच्या हालचालींची सखोल चौकशी सुरू केली आहे. त्याच्याविरोधात गुप्त माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जसबीर सिंहचे संबंध शाकिर ऊर्फ जट्ट रंधावा या पाकिस्तानी हेराशी होते. जसबीरचा संपर्क एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातून हकालपट्टी करण्यात आलेल्या अधिकाऱ्याशी देखील होता. तसेच, सध्या अटकेत असलेल्या हरियाणामधील यूट्यूबर ज्योती मल्होत्राशीही त्याचा नियमित संपर्क होते.

    जसबीरने दिल्लीतील पाकिस्तान नॅशनल डे कार्यक्रमात दानिशच्या आमंत्रणावरून सहभाग घेतला होता. त्याने पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांशी जवळीक साधली. तो २०२०, २०२१ आणि २०२४ या तीन वेळा पाकिस्तानात गेला होता. त्याच्या मोबाईल व लॅपटॉपमध्ये अनेक पाकिस्तानशी संबंधित फोन नंबर आढळले असून, त्यांची सध्या फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

    ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर, जसबीरने आपल्या पाकिस्तानी संपर्कासंबंधी पुरावे हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक दृढ झाला.

    पंजाब पोलिसांचे महासंचालक म्हणाले, “ही संपूर्ण गुप्तचर-दहशतवादी यंत्रणा नष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे. या जाळ्यातील इतर सर्व सहकारी आणि कनेक्शन शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. देशाच्या सुरक्षेसाठी पंजाब पोलिस पूर्णपणे कटिबद्ध आहेत.”

    Another YouTuber spied on, YouTuber with 1.1 million subscribers from Punjab arrested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mahua Moitra : TMC MP महुआ मोईत्रा BJD नेत्याशी विवाहबद्ध; पिनाकी मिश्रा पुरीचे माजी खासदार

    Bengaluru : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई, RCBचा मार्केटिंग हेड अटक

    Kamal Hasan : राज्यसभा निवडणुकीसाठी कमल हसन यांनी दाखल केला अर्ज