वृत्तसंस्था
कटक : ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढत असून या आजाराने देशात दुसरा बळी गेला आहे. ओडीशातील बोलांगीरमधील एका महिलेचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये वृद्धाचा ओमिक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाला होता. Another victim of Omicron in Odisha; Woman loses life; Anxiety due to continuous increase in the number of patients
संबलपूर जिल्ह्यातील वीर सुरेंद्र साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला ओमिक्रॉनची लागण झाली होती, असे उघड झाले आहे.
अगलपूर गावची रहिवासी असलेली ही महिलेला गेल्या महिन्यात पक्षाघात झाला होता. २० डिसेंबर रोजी बालांगीरच्या भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचारादरम्यान, महिलेला संबलपूर बुर्लामध्ये रेफर केले होतं. त्यानंतर प्रकृती खालावल्यानंतर कोरोना चाचणीसाठी सॅम्पल घेतले. पुढच्या दिवशी म्हणजेच, २३ डिसेंबर रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
जयपूरमध्ये पहिला मृत्यू
जयपूरमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला मधूमेहासह आणखी काही आजार होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, ओमिक्रॉन संसर्गाचा अहवाल येण्याआधी या व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी त्याचा मृत्यू हा ओमिक्रॉनमुळेच झाला आहे. कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर नियमानुसार उपचार सुरू होते.