target killing in Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये सामान्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा टारगेट किलिंग केली आहे. बिहार आणि यूपीमधील दोन मजुरांना वेगवेगळ्या घटनांमध्ये गोळ्या लागल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगरमधील ईदगाह पार्कमध्ये बिहारमधील एका मजुराच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. अरविंद कुमार असे या मजुराचे नाव आहे. याशिवाय, यूपीचा रहिवासी सगीर अहमद यालाही पुलवामामध्ये गोळी लागली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. another target killing in Kashmir, 2 non local labour shot by terrorists in srinagar and pulwama one dead
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू -काश्मीरमध्ये सामान्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा टारगेट किलिंग केली आहे. बिहार आणि यूपीमधील दोन मजुरांना वेगवेगळ्या घटनांमध्ये गोळ्या लागल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगरमधील ईदगाह पार्कमध्ये बिहारमधील एका पाणीपुरी विक्रेत्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. अरविंद कुमार असे मृताचे नाव आहे. याशिवाय, यूपीचा रहिवासी सगीर अहमद यालाही पुलवामामध्ये गोळी लागली असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
श्रीनगरमध्ये बिगर मुस्लिम आणि बाहेरील लोकांना सतत लक्ष्य केले जात आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला गोळी लागली ती जम्मू -काश्मीरची रहिवासी नव्हती. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा टारगेट किलिंग केली आहे. मजुराच्या डोक्यात गोळी लागली आहे. पोलिसांनी सांगितले की, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव अरविंद कुमार शाह असे आहे. तो 30 वर्षांचा होता.
ओमर अब्दुल्ला यांनी केला निषेध
जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये एका सामान्य मजुरावर गोळ्या झाडल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, अशा प्रकारे लक्ष्य करण्याचे आणखी एक प्रकरण. अरविंद कुमार रोजगाराच्या शोधात श्रीनगरला आला होता आणि येथे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
another target killing in Kashmir, 2 non local labour shot by terrorists in srinagar and pulwama one dead
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा विचार करेन, पण पक्षनेत्यांकडून विचारधारेवर स्पष्टता हवी’ – CWC बैठकीत राहुल गांधींचे प्रतिपादन
- ‘CWCची कमी आणि परिवार बचाओ वर्किंग कमिटीची बैठक जास्त’, भाजप नेते गौरव भाटियांची काँग्रेसवर कडाडून टीका
- कोरोना लसीकरणाच्या १०० कोटी डोसच्या उत्सवाची तयारी, केंद्रीय मंत्री मांडविया-पुरी यांनी लाँच केले कैलाश खेर यांचे गाणे
- सिंघू बॉर्डरवरील खून प्रकरणात निहंग सरबजीतने 4 नावे दिली, न्यायालयाने सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी
- आरोग्यमंत्री मंडावियांवर माजी पीएम मनमोहन सिंग यांच्या कन्येचा संताप, हॉस्पिटलमधील फोटोसेशनवर सुनावले, म्हणाल्या – माझे वडील प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाहीत!